Candidates running in field test in Police Recruitment conducted by City Police Commissionerate at Minatai Thackeray Maidan. esakal
नाशिक

Nashik Police Recruitment: 1600 मीटर धावण्यात बहुतांशी उमेदवारांना ‘भोपळा’! पोलिस भरतीमध्ये उमेदवारांची मैदानी चाचणी

Police Recruitment : शहर, ग्रामीण पोलिस दलातील रिक्त शिपाई जागांसाठी सध्या मैदानी चाचणी सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Recruitment : शहर, ग्रामीण पोलिस दलातील रिक्त शिपाई जागांसाठी सध्या मैदानी चाचणी सुरू आहे. मात्र, या चाचणीच्या १६०० मीटर धावणाच्या चाचणीमध्ये बहुतांशी उमेदवारांना भोपळाही फोडता आलेला नाही. तर, गोळाफेक चाचणीत पैकीच्या पैकी गुण घेताना मात्र, एकूण मैदानी चाचणीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवू शकलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील पोलिस भरतीची प्रक्रिया तब्बल चार ते पाच महिन्यांनी सुरू झाली आहे. ( Police Recruitment most of candidates not qualified in running 1600 meter )

त्यातही राज्यातील काही ठिकाणी पावसाच्या व्यत्ययामुळे पोलिस भरतीची मैदानी चाचणी चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, नाशिक शहरातील मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅकवर तर, नाशिक ग्रामीणची मैदानी चाचणी आडगावच्या मुख्यालयाच्या मैदानावर सुरू आहे. याठिकाणी १०० मी.साठी वॉटरप्रुफ मंडप आहे तर १६०० मी. धावण्याची चाचणी डांबरी रस्त्यावर होते आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पावसामुळे चाचणीमध्ये तसा व्यत्यय आलेला नाही.

मात्र, मैदानाची चाचणीसाठी येण्याऱ्या उमेदवारांची कागदपत्रांच्या पडताळणीनंतर उंची, छाती मोजमाप होते. त्यात पात्र ठरलेल्यांना मैदानात चाचणीसाठी पाठविले जाते. यात उमेदवारांना १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे व गोळाफेक या तीन चाचण्या पूर्ण कराव्या लागतात. परंतु यातील १६०० मीटर धावण्याच्या चाचणीमध्ये बहुतांशी उमेदवारांना शून्य गुण प्राप्त झालेले आहेत. (latest marathi news)

या मैदानी चाचणीला गेल्या बुधवारपासून प्रारंभ झाला असून, या चार दिवसांत एकाही उमेदवाराला ५० गुण मिळू शकलेले नाहीत. नाशिक शहर पोलिस भरतीची मैदानी चाचणी २९ जूनला संपणार आहे. मैदानी चाचणी आटोपल्यानंतरच या मैदानी चाचणीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार असून, यातील बहुतांशी उमेदवारांना ४० ते ४७ या दरम्यान प्राप्त झालेले आहेत. यामुळे कटऑप ‘हाय’ लागण्याचीच शक्यता आहे.

येथे सुरू आहे मैदानी चाचणी

शहर पोलिस आयुक्तालयाच्या रिक्त ११८ जागांसाठी ५ हजार ५९० पुरुष, २ हजार १२५ महिला व २ तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर ग्रामीणसाठी रिक्त ३२ जागांसाठी २ हजार ६०२ पुरुष, ५७६ महिला, ४२ माजी सैनिक व इतर पाच उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत. शहर पोलिसांनी मैदानी चाचणी पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअम तर, ग्रामीण पोलिसांनी आडगाव येथील मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT