Document Verification esakal
नाशिक

Nashik Police Recruitment : निवड यादीतील उमेदवारांची उद्यापासून पडताळणी; शहर आयुक्तालय

Nashik News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महाराष्ट्र पोलिस दलातील रखडलेली पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त ११८ शिपाई पदासाठी मैदानी चाचणी घेण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेली पोलिस भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली आहे. मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षेची निवड यादी जाहीर केल्यानंतर मंगळवारपासून (ता. १६) यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. सदरची पडताळणी पोलिस आयुक्तालयाच्या भीष्मराज सभागृहात होणार आहे. (Nashik Police Recruitment Verification of shortlisted candidates from tomorrow)

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महाराष्ट्र पोलिस दलातील रखडलेली पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त ११८ शिपाई पदासाठी मैदानी चाचणी घेण्यात आली. ३० जून रोजी मैदानी चाचणी आटोपली. त्यानंतर, पात्र ठरलेल्या सुमारे साडेचार हजार उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली.

या परीक्षेचा गेल्या आठवड्यात कटऑफ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, ११८ जणांची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी येत्या मंगळवारपासून (ता. १६) केली जाणार आहे.

यासाठी उमेदवारांनी पोलिस मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृह याठिकाणी सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे. यावेळी येताना उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रत, चेस्ट क्रमांक कागद, लेखी परीक्षा पडताळणी प्रत. (latest marathi news)

तसेच मूळ कागदपत्रांची झेरॉक्स प्रत, सहा पासपोर्ट साईज छायाचित्रही आणायचे आहेत. यावेळी उमेदवारांची कार्यालयाच्या अभिलेख्यावरील फोटोवरून, तसेच, बायोमॅट्रिक थमद्वारे पडताळणी केली जाणार आहे, असेही आयुक्तालयातर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

ऑगस्टपासून प्रशिक्षण

जुलैअखेरपर्यंत पोलिस भरतीची प्रक्रिया संपवून, निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पोलिस प्रशिक्षण केंद्रांत प्रशिक्षणांसाठी पाठविले जाणार आहे. ऑगस्टपासून या प्रशिक्षणार्थी पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका असल्याने त्या काळात या प्रशिक्षणार्थींचा वापर बंदोबस्तासाठी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT