Nashik Tourist Places  esakal
नाशिक

Nashik Tourist Places : विकेण्ड पावसाळी पर्यटनावर पोलिसांकडून निर्बंध! भावली, गंगापूर धरणासह त्र्यंबक परिसरात बंदोबस्त लावणार

Nashik News : नाशिक जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने अजूनही डोंगररांगांतील धबधबे वाहताना दिसत नाहीत. तरीही इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरातील धरणक्षेत्रामध्ये पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होऊ लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पुण्यातील लोणावळा येथे पावसाळी पर्यटनादरम्यान एका कुटूंबातील पाच जणांचा पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणीही पोलिसांकडून निर्बंध जारी करण्यात आलेले आहे. विशेषत: धरण क्षेत्रातील धबधबे, भावली, गंगापूर धरण परिसरासह त्र्यंबक, इगतपुरी परिसरात वनविभागाच्या मदतीने संयुक्त बंदोबस्ताचे नियोजन केले जाणार आहे.(Nashik Tourist Places)

तसेच, हुल्लडबाजी करणार्यांविरोधात कारवाईचा बडगाही उगारला जाणार असल्याचे संकेत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने अजूनही डोंगररांगांतील धबधबे वाहताना दिसत नाहीत. मात्र तरीही इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरातील धरणक्षेत्रामध्ये विकेण्डला पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील धबधबे, किल्ले, निसर्गरम्य ठिकाणांवर पर्यटकांची गर्दी वाढत असते.

पावसाचा जोर वाढल्यावर अनेक डोंगर रांगातील धबधबे कोसळू लागतात आणि ते पावसाळी पर्यटकांना आकर्षित करीत असतात. मात्र यातून बर्याचदा पर्यटक जीव धोक्यात घालून नको त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात तर काहीजण धबधब्याच्या नजिक जाण्याचा वा नदी-आेहोळ-नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न घेतात त्यात जातात. परिणामी, त्यातून पर्यटकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते.

यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी येत्या विकेण्डपासून निर्बंध लावले आहेत. जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच, हुल्लडबाजी करणार्याविरोधात थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. (latest marathi news)

अशाठिकाणी जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आलेले आहेत. यासाठी वनविभागाची मदत घेतली जाणार आहे. पोलीस व वनविभाग संयुक्तरित्या पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी गस्त घालणार आहेत. तसेच, ऑनलाईन इ-पासचे नियोजन केले जाणार असल्याचे अधीक्षक देशमाने यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळे

त्र्यंबक परिसरातील ब्रह्मगिरी पर्वत रांग, अंजनेरी, पहिने फॉल, हरिहर, साल्हेर-मुल्हेर, रामशेज किल्ला, चामरलेणी, दुगारवाडी धबधबा, मांगीतुंगी, सप्तश्रृंगी गड, इगतपुरी परिसर, वाडिवऱ्हे, कावनई आदी.

"पावसाळी पर्यटनासाठी जाताना सुरक्षितता महत्त्वाची आहे. नागरिकांनी कोणताही धोक पत्करू नये. सुरक्षितरित्या पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यावा. हुल्लडबाजी करणार्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाईल." - विक्रम देशमाने, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT