फोटो : A14918
नाशिक : चोरीस गेलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत करताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की
--
चोरीस गेलेल्या वस्तू नागरिकांच्या पुन्हा हाती
साडेतीन कोटींहून अधिकचा मुद्देमाल तक्रारदारांना परत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ अंतर्गत विविध ठाण्यांमध्ये दाखल मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांतील सुमारे ३ कोटी ७५ लाख ३० हजार ७५८ रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला. यात सोने-चांदीचे दागिने, स्त्रीधन, दुचाकी-चारचाकी वाहने, मोबाईल, रोख रक्कम, जेसीबी, रिक्षा, लॅपटॉप यांसह विविध वस्तूंचा समावेश आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांतील जास्तीत जास्त मुद्देमाल हस्तगत करून न्यायालयीन प्रक्रिया लवकर पूर्ण करत तो तक्रारदारांना परत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार परिमंडळ एकच्या पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत यांनी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मुद्देमाल विल्हेवाट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून कार्यवाहीला गती दिली. १५ ते ३० सप्टेंबर अशा पंधरा दिवसाच्या कालावधीत आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील प्रकरणांमधील मुद्देमाल परत करण्यात आला. या कारवाईत ९९८.७११ ग्रॅम सोन्याचे दागिने, स्त्रीधन, १ किलो ८८४ ग्रॅम चांदीचे दागिने, ४९ मोटारसायकली, २५ चारचाकी वाहने, एक जेसीबी, पाच रिक्षा, १२ मोबाईल आणि २ लाख ८३ हजार २५० रुपयांची रोख रक्कम परत करण्यात आली. याशिवाय लॅपटॉप, घड्याळ, कुलर, प्युरिफायर, स्टेपनी, पलंग, खुर्च्या, टेबल फ्रेम, तांबे-पितळी भांडी, लोखंडी जॅक व सेंट्रिंग प्लेट्स आदी साहित्याचाही समावेश आहे. चोरीस गेलेली वस्तू परत मिळाल्याने तक्रारदारांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेचे कौतुक करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.