Bhuse vs Raut esakal
नाशिक

Nashik Political: पालकमंत्री भुसेंच्या तक्रारीवरुन खासदार राऊत यांच्याविरुद्ध फौजदारी खटल्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : बदनामीकारक वृत्त छापल्याच्या आरोपावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध येथील न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

ती ग्राह्य मानून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंग संधू यांनी राऊत यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले. खासदार राऊत यांना २३ ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. (Nashik Political Criminal case ordered against MP sanjay Raut nashik)

गिरणा साखर कारखान्याच्या नावाखाली १७८ कोटींचा घोटाळा केल्याबाबतचे हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. केवळ राजकीय द्वेषापोटी बदनाम करण्याच्या उद्देशाने वृत्त प्रसिद्ध केल्याचे सांगत भुसे यांच्यातर्फे ॲड. सुधीर अक्कर यांच्यामार्फत खासदार राऊत यांना नोटीस बजावण्यात आली होती.

राऊत यांनी नोटिसीला उत्तर दिले नाही. भुसे यांनी ॲड. अक्कर व ॲड. योगेश निकम यांच्यामार्फत खटला दाखल केला आहे.

"या फौजदारी खटल्यात दादा भुसे यांच्या नावलौकिकास बाधा यावी, या उद्देशाने वृत्त छापल्याचे सकृतदर्शनी गुन्हा घडल्याचे स्पष्ट होते. खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात नोटीस पाठवूनही कोणताही प्रतिसाद दिला नाही."

- ॲड. सुधीर अक्कर (मालेगाव), पालकमंत्री दादा भुसे यांचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil : आमदार सतेज पाटील यांची 'वाट' बिकट; नगरपालिकांच्या निकालाने बदलले समीकरण, काय असणार पुढची रणनीती?

WTC 2027 Final : न्यूझीलंडचा विजय अन् टीम इंडियाच्या फायनलचा मार्ग बंद; ऑस्ट्रेलियासोबत किवींची Point Table मध्ये मजबूत पकड

आजचे राशिभविष्य - 22 डिसेंबर 2025

Solapur Municipal Results: साेलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप अपेक्षित यशापासून दूर; चार ठिकाणी विजय, उमेदवार निवडीत चुका नडल्या..

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT