MNS Logo esakal
नाशिक

Nashik MNS News : आयात उमेदवारीमुळे मनसेत नाराजीचे फटाके!

Latest Political News : नाशिक शहरातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांची कमी संख्या लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारी आयात केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिल्याने इतर पक्षात उमेदवारी न मिळालेल्यांसाठी रेड कार्पेट अंथरले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik MNS News : सत्ताधारी व विरोधी पक्षांना सक्षम पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणुका लढविण्याची तयारी करण्यात आली आहे. त्या संदर्भात पक्षाकडून आढावादेखील घेतला जात आहे.

मात्र, नाशिक शहरातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांची कमी संख्या लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारी आयात केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिल्याने इतर पक्षात उमेदवारी न मिळालेल्यांसाठी रेड कार्पेट अंथरले जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. (dispute of MNS displeasure due to import candidacy)

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांचा उत्तर महाराष्ट्र दौरा केला. नाशिक मुक्कामी असलेल्या ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील ४७ पैकी ४० जागा लढण्याची तयारी केली आहे. परंतु सद्यःस्थितीत मनसेपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे तिसऱ्या आघाडीकडे इच्छुकांची संख्या अधिक दिसून येत आहे.

ठाकरे यांच्या दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यामध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या फारच कमी असल्याने व त्यातही तुल्यबळ असे नेतृत्व नसल्याने राज ठाकरे यांनी ऐनवेळी उमेदवार आयात केला जाईल, असे स्पष्टीकरण दिले. ठाकरे यांच्या स्पष्टीकरणानंतर मनसेमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. (latest marathi news)

एकेकाळी तीन आमदार व महापालिकेत सत्ता देणाऱ्या मनसेला नाशिकमधून विजयाची अपेक्षा आहे. मात्र इच्छुकांची अपेक्षित अशी संख्या नाही. पूर्व विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर अशोक मुर्तडक व प्रसाद सानप हे इच्छुक आहेत. पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे महानगरप्रमुख सुदाम कोंबडे व माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर इच्छुक आहेत.

मध्य नाशिक मतदारसंघांमधून महिला आघाडीचे अध्यक्ष सुजाता ढेरे व जिल्हाध्यक्ष अंकुश पवार इच्छुक आहेत. देवळाली विधानसभा मतदारसंघातून प्रमोद साखरे व रोहिणी जाधव तसेच धरम गोविंद यांनी निवडणुकीसाठी तयारी दर्शविली आहे. मालेगाव मध्ये बागलाण या मतदारसंघांमधूनदेखील मनसेकडे इच्छुक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT