नाशिक

स्वीकृत अर्जासाठी आज शेवटचा दिवस

CD
एन्कर ------------- ठाकरे सेनेच्या दोन नावांवर शिक्कामोर्तब; भाजपमध्ये लॉबिंग स्वीकृत नगरसेवक अर्जासाठी आज शेवटचा दिवस; हालचालींना वेग सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : महापालिकेतील १० स्वीकृत नगरसेवकपदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत बुधवार (ता. ४) दुपारी ३ वाजेपर्यंत असून प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. एकूण दहा स्वीकृत सदस्यांपैकी शिवसेनेच्या (उबाठा) दोन नावांवर शिक्कामोर्तब झाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे, तर भाजपमध्ये शंभराहून अधिक इच्छुक असल्याने मुंबईत लॉबिंग सुरु आहे. शिवसेनेची नावे ठाण्यातून निश्‍चित होणार असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. उच्च न्यायालयाने सहा आठवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर आयुक्त मनीषा खत्री यांनी गटनेत्यांची बैठक घेऊन सुरुवातीला २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र ३१ ऑक्टोबरच्या राष्ट्रपतींच्या ध्वजारोहण सोहळ्यामुळे ती ४ नोव्हेंबरपर्यंत वाढविली. संख्याबळानुसार भाजपला ६, शिवसेनेला २ आणि उबाठा-काँग्रेस आघाडीला २ जागांचा कोटा मिळाला आहे. एका जागेसाठी एकच अर्ज करता येणार असून अर्ज बाद झाल्यास संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी लागणार असल्याने पक्ष सावध आहेत. विरोधी गटातील दोन्ही जागांसाठी शिवसेनेने (उबाठा) जवळपास नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपमध्ये ६ जागांसाठी चुरस असून, इच्छुकांची मोठी यादी आहे. वरिष्ठ पातळीवर जोरदार लॉबिंग सुरू आहे. अंतिम यादी रात्री उशिरापर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. तूर्त तीन विधानसभा मतदारसंघात प्रत्येक आमदारांकडून एका नावाला पसंती देण्यात आल्याचे समजते. शिवसेनेच्या दोन नावांबाबतचा अंतिम निर्णय ठाण्यातून होणार असून, बुधवारी (ता. ४) दुपारपर्यंत तिन्ही पक्षांचे गटनेते आयुक्तांकडे अर्ज सादर करणार आहेत. त्यानंतर आयुक्तांचा प्रस्ताव महासभेत जाऊन महापौर स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करतील. -------------चौकट काँग्रेसची नाराजी स्वीकृतसाठी शिवसेना (उबाठा) सोबत गटनोंदणी केलेल्या काँग्रेसला दोनपैकी एक स्वीकृत पद हवे आहे. त्यासाठी ठाकरे सेनेशी दोन हात करण्याचीदेखील तयारी आहे. परंतु गटनोंदणीनुसार शिवसेना (उबाठा) गटनेत्यांचा अंतिम निर्णय राहणार असल्याने उबाठा, काँग्रेस युती तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. --------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Iran War: नेतन्याहू यांचा मोठा प्लॅन लीक! इराणला उद्ध्वस्त करण्याचा डाव? चार लष्करी अधिकाऱ्यांच्या खिशात...

Operation Lotus: जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन कमळ’? राजकीय चर्चांना उधाण; काय म्हणाले राम माधव?

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मिठाई विक्रेत्यांना दणका! कोंढवा, आळंदीतून १ हजार ४९१ किलो मिठाई जप्त करून नष्ट

Mumbai Bengaluru Train: मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरची क्रेझ! महागड्या प्रथम श्रेणीचे आरक्षणही 'रिग्रेट', प्रतीक्षा यादी शंभरीपार

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

SCROLL FOR NEXT