A contingent of Bhadrakali police arrived at Lakshminarayan Ghat for investigation. esakal
नाशिक

Nashik News : लक्ष्मीनारायण घाटावर अंधारात पूजा! जादूटोण्याच्या शंकेमुळे पोलिसांकडून मज्जाव

Latest Nashik News : परिसरातील नागरिकांमध्ये घटनेची माहिती मिळताच भीती पसरली होती, असे प्रकार येथे होऊ नयेत तसेच संबंधित व्यक्ती माहिती लपवीत असल्याचे सांगत त्यांच्याकडून जादूटोणाच होत असल्याची शंका व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : लक्ष्मीनारायण घाट येथील अंधारात सुरू असलेला जादूटोण्याचा प्रकार भद्रकाली पोलिसांनी उधळला. चौकशीअंती सर्वसाधारण पूजेसाठी नागरिक आल्याची माहिती समोर आली. परिसरातील नागरिकांनी मात्र शंका उपस्थित केली. (Pooja in darkness at Lakshminarayan Ghat)

गोदा काठावरील लक्ष्मीनारायण घाट अतिशय सुनसान आणि शांततेचा भाग आहे. नागरिकांचाही त्याठिकाणी अल्प वावर असतो. अशा भागात मंगळवारी (ता.१) रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास प्रचंड अंधारात काही जण काळ्या कपड्यांमध्ये काहीतरी पूजा विधी करत होते. जादूटोणा तर सुरू नाही ना, अशी शंका परिसरात वावरणाऱ्या नागरिकांना आली.

त्यांनी भद्रकाली पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी कुठलाही वेळ न घालवता घटनास्थळी दाखल झाले. काहीजण काहीतरी विधी करत असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी सविस्तर चौकशी केली. काहींनी साधी पूजा सुरू असल्याचे सांगितले तर काहींनी कालसर्प पूजा सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मात्र सविस्तर चौकशी केली. साधी पूजा सुरू असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. (latest marathi news)

जादूटोणाच असल्याची शंका

अशा अंधारात कुठलीही पूजा संशयास्पद ठरू शकते. यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित व्यक्तींना त्याठिकाणी कुठलीही विधी करण्यास मज्जाव करत त्यांना तेथून जाण्यास सांगण्यात आले. असे असले तरी परिसरातील नागरिकांमध्ये घटनेची माहिती मिळताच भीती पसरली होती, असे प्रकार येथे होऊ नयेत तसेच संबंधित व्यक्ती माहिती लपवीत असल्याचे सांगत त्यांच्याकडून जादूटोणाच होत असल्याची शंका व्यक्त केली. सुनसान ठिकाणी अंधारात असा प्रकार सुरू असेल तर कुठल्याही व्यक्तींना शंका येणारच, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. पोलिसांनी येथील गस्त वाढवावी, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT