Gole Colony esakal
नाशिक

Nashik Medical Hub : पार्किंगची वाणवा, शौचालय गायब ‘मेडिकल हब’ ची दयनीय अवस्था

Nashik News : कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या गोळे कॉलनीतील मेडीकल हबमध्ये दिवसागणिक नागरिकांचा राबता वाढत असला तरी पायाभूत सुविधांच्या बाबतीत दयनीय अवस्था आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : संपूर्ण जिल्ह्याला औषधांचा पुरवठा करणाऱ्या व कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या गोळे कॉलनीतील मेडीकल हबमध्ये दिवसागणिक नागरिकांचा राबता वाढत असला तरी पायाभूत सुविधांच्या बाबतीत दयनीय अवस्था आहे. या भागात सिमेंट-कॉंक्रिटचे चकाचक रस्ते असले तरी पार्किंग व शौचालयाची व्यवस्था नसल्याने येथे येणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होत आहे. (Poor condition of Medical Hub)

नाशिक जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा ‘सकाळ संवाद’ सातपूर कार्यालयात झाला. केमिस्टच्या समस्यांबरोबरच मेडीकल हबच्या समस्या यावेळी प्रामुख्याने मांडण्यात आल्या. त्यात वरील धक्कादायक बाब समोर आली. अनेक वर्षांपासून गोळे कॉलनी हे मेडीकल हब म्हणून नावारूपाला आले आहे.

सुरवातीच्या काळात दहा-बारा दुकानांवर सुरु झालेल्या या व्यवसायाने पंख पसरले. चारशेहून अधिक मेडिकल दुकाने या भागात आहेत. जागा अपुरी पडत असल्याने मुंबई नाका व उपनगरांमध्ये होलसेल मेडीकल डिस्ट्रीब्युटरची दुकाने तयार झाली आहेत. जिल्हाभरात मेडिकल हब म्हणून गोळे कॉलनीची ख्याती पसरल्याने या भागात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक औषधे खरेदीसाठी येतात.

यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने गर्दी होते. परंतु येथे आल्यावर सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो तो पार्किंगचा. चारचाकी सोडा दुचाकी पार्किंगसाठीही जागा नसल्याने मिळेल त्या जागेवर मिळेल तशी वाहने पार्किंग करावी लागतात. चारचाकी वाहने कामाच्या जागेपासून एक, दीड किलोमीटर अंतरावर लावावी लागतात. (latest marathi news)

त्यामुळे वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होतो. गर्दीमुळे जीव मुठीत घेऊनच वावरावे लागते, अशी स्थिती आहे. छोट्या गल्ल्यांमध्ये चारचाकी सोडून दीड ते दोन हजार वाहने पार्किंगमध्ये लागलेली असतात. महापालिकेने पार्किंगची व्यवस्था करणे आवश्‍यक आहे. त्र्यंबक नाका सिग्नल ते अशोक स्तंभ या दरम्यान स्मार्ट रस्त्यावर तयार केलेला सायकल ट्रॅक हटवून पे ॲण्ड पार्क करावे. तसेच वकिलांसाठी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमच्या जागेवर कायमस्वरूपी पार्किंगची मागणी यावेळी करण्यात आली.

शौचालयांवाचून कुचंबणा

जिल्ह्याच्या सर्वच भागातून येथे नागरिक खरेदीसाठी येतात. खासगी शौचालये असली तरी सार्वजनिक शौचालय नसल्याने ही मोठी समस्या या भागात आहे. स्मार्ट रोडवर शौचालये आहेत. महापालिका मुख्यालय, पोलिस आयुक्त कार्यालयासमोर तात्पुरत्या स्वरूपात शौचालये आहेत. कामाच्या जागेपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असल्याने तेथे पोचता येत नाही.

"गर्दीचे ठिकाण असूनही गोळे कॉलनीत पार्किंगची सोय नाही. सार्वजनिक शौचालयाची नितांत आवश्‍यकता आहे. महापालिकेने दोन्ही सोयींना प्राधान्य द्यावे." - सुदेश आहेर, अध्यक्ष, नाशिक जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

भारतीयांमध्ये खेळाडूवृत्ती नाही...! शाहिद आफ्रिदीने 'Handshake' प्रकरणावर सूर्यकुमार यादव, BCCI ला सुनावले

IOB Recruitment 2025: IOB मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी होईल?

Dehradun Sahastradhara Cloudburst : सहस्रधारात पावसाचा हाहाकार, दुकाने गेली वाहून; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT