alcohols (file photo) esakal
नाशिक

Nashik News : महाराष्ट्रातून मद्य पुरवठा होण्याची शक्यता; जिल्हा निवडणूक विभागाकडे गुजरातच्या मतदारांची तक्रार

Nashik : गुजरातमध्ये दारुबंदी असली तरी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून मद्यपुरवठा केला जाऊ शकतो.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गुजरातमध्ये दारुबंदी असली तरी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून मद्यपुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमांवर चेकपोस्ट अधिक कडक करण्याची तक्रार गुजरातच्या मतदाराने सीव्हिजील ॲपच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. गुजरातमध्ये ७ मेस तर नाशिक, दिंडोरीत २० मेस मतदान होत आहे. गुजरातमध्ये दारुबंदी असल्याने निवडणूक काळात महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या सीमावर्ती भागातून गुजरातमध्ये दारू जाण्याची शक्यता गुजरातचे मतदारच व्यक्त करत आहेत. ( Possibility of liquor supply from Maharashtra in gujarati )

दमण- दीवसारख्या केंद्रशासित प्रदेशांसह राज्यांमधून ट्रकमधून दारूची तस्करी होण्याची शक्यता आहे. याविषयी तेथील मतदार नाशिक जिल्हा प्रशासनाच्या आचारसंहिता कक्षाकडे तक्रारी नोंदवत आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबार व नाशिक पोलिस हे सीमावर्ती भागामध्ये मोठा पोलिस फौजफाटा घेऊन गस्त घालत असल्याचे दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (latest marathi news)

असे असतानाही गुजरातच्या एका मतदाराने आहवा- चिंचली मार्गे चिंचली चेकपोस्ट वरून गुजरातमध्ये दारू येण्याची शक्यता वर्तवली आहे. या चेकपोस्टवर वाहनांची तपासणीच होत नसल्याचा आरोप त्या मतदाराने सीव्हीजील अ‍ॅपवर तक्रार देत केला आहे.

नाशिक व नंदुरबारचे पोलिस अधीक्षक आणि अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक सीमा भागात गस्त घालत कोम्बिंग ऑपरेशन राबवत आहेत. तसेच महाराष्ट्र, गुजरात सीमावर्ती भागात पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातून जाणाऱ्या वाहनांची गुजरात पोलिसांकडून कसून तपासणी केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT