Dandgaval family and doctors during organ donation procedure at Apollo Hospital. esakal
नाशिक

Organ Donation : चोविसाव्या वर्षी मेंदू मृत झाल्‍याने प्रतीकचे अवयवदान!

Nashik News : वयाच्‍या अवघ्या चोविसाव्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्‍या प्रतीक प्रमोद दंडगव्‍हाळ याचे हृदय अविरत धडकत राहील अन्‌ डोळे या सुंदर जगाची अनुभूती घेतली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वयाच्‍या अवघ्या चोविसाव्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्‍या प्रतीक प्रमोद दंडगव्‍हाळ याचे हृदय अविरत धडकत राहील अन्‌ डोळे या सुंदर जगाची अनुभूती घेतली. प्रतीकला मेंदूमृत घोषित केल्‍यानंतर त्‍याच्‍या कुटुंबीयांनी घेतलेल्‍या अवयवदानाच्‍या निर्णयामुळे खितपत पडलेल्‍या सहा रुग्‍णांना नवजीवन मिळाले आहे. (Prateek organ donation due to brain death at the age of twenty four)

अपोलो हॉस्‍पिटलमध्ये अवयवदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. हृदय, यकृत, दोन मूत्रपिंड आणि डोळे दान करण्यात आले. त्र्यंबक रोडवर दुचाकी वाहनाच्‍या अपघातात प्रतीक दंडगव्हाळ (२४, रा. बोधलेनगर) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्‍याला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु त्‍याच्‍यावर उपचार सुरू असताना कोमात गेल्‍यानंतर तो मेंदू मृतावस्थेकडे गेला.

त्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या केल्‍यानंतर अहवाल बघून अपोलो हॉस्पिटलमधील ब्रेन डेथ कमिटीमधील डॉक्टरांनी त्याला मेंदूमृत घोषित केले. डॉक्टरांनी प्रतीकच्या कुटुंबीयांना अवयवदानाची माहिती दिली व सर्व नातेवाईक आणि आईवडिलांनी वेळ वाया न घालवता अवयवदान करण्यास सहमती दर्शवली व लगेच प्रक्रिया सुरू झाली.

अपोलो हॉस्पिटलमध्ये लगेचच मूत्रपिंडाच्‍या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियादेखील सुरू केली. अपोलो हॉस्पिटलचे युरोसर्जन डॉ. प्रवीण गोवर्धने आणि मूत्रपिंड विकारतज्‍ज्ञ डॉ. प्रकाश उगले म्हणाले, की अवयवदानाची सर्वाधिक गरज भारताला असून, नाशिकमध्ये अवयव दानाचे प्रमाण अत्‍यल्‍प आहे. चोविसाव्या वर्षी मुलगा मेंदू मृत अवस्थेत असताना आईवडील, नातेवाइकांनी अवयवदानाची सहमती दिली, ही मोठी गोष्ट आहे. (latest marathi news)

अपोलो हॉस्पिटलचे युनिट हेड अजित झा म्हणाले, की आरोग्य संचनालयाकडून अपोलो हॉस्पिटलमध्ये ब्रेन डेथ कमिटी नियुक्त केली आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ही प्रक्रिया सुलभपणे पार पडली. प्रतिकच्या अवयव दानातून ६ रुग्णांना नवीन जीवन मिळाले. अवयवदान, अवयव प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत अपोलो हॉस्पिटलमधील मेंदू व मणके शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. संजय वेखंडे, मेंदुविकार तज्ञ डॉ. जितेंद्र शुक्ल.

मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्‍ज्ञ डॉ. मोहन पटेल, हृदय शस्त्रक्रिया तज्‍ज्ञ डॉ. अभयसिंग वालिया, युरोसर्जन डॉ. किशोर वाणी, डॉ. अमोलकुमार पाटील अतिदक्षता विभागाचे डॉ. अतुल सांगळे, डॉ. अमोल खोळमकर, डॉ. प्रवीण ताजणे, डॉ. बालाजी वड्डी, डॉ. राहुल भामरे, भुलतज्ञ डॉ. भूपेश पराते, डॉ.चेतन भंडारे, डॉ.अमिता टिपरे, अवयव प्रत्यारोपण समन्वयक चारुशीला जाधव यांनी परीश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: KL Rahul ने शतकानंतर का वाजवली शिट्टी? या नव्या सेलिब्रेशनमागचं नेमकं कारण काय?

Video : राजेशच राकेश असल्याचं सत्य ईश्वरीसमोर उघड ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता तरी तिला अक्कल येऊ दे"

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Dmart Offers : दसरा स्पेशल! डीमार्टमध्ये 'या' वस्तू मिळतायत जास्त स्वस्त, पुढचे 4 दिवस डिस्काउंट ऑफर, पाहा एका क्लिकवर..

OBC Scholarship Schemes : १०वी, १२वीच्या ओबीसी विद्यार्थ्यांना मिळते शासनाची शिष्यवृत्ती, सरकारच्या 'या' ८ योजना जाणून घ्या....

SCROLL FOR NEXT