Mutual Fund Investment news
Mutual Fund Investment news esakal
नाशिक

Nashik News : Mutual फंडात नाशिककरांची पसंती; गुंतवणुकीत 5 वर्षात 28 टक्के वाढ!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकमधील एकूण गुंतवणूकदारांची संख्या पाच वर्षात २. ६० लाखाने वाढली. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत नाशिककर जागरूक असले तरी त्यांना गुंतवणूक मार्गदर्शन करणाऱ्या नोंदणीकृत एजंटची संख्या मात्र अत्यल्प आहे. चांगल्या मार्गदर्शन अभावी गती कमी आहे.

योग्य सल्लागार वाढले तर नाशिक म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत नाशिक अग्रेसर असेल, असा दावा यूटीआय समूहाचे अध्यक्ष वितरण प्रमुख पेशोतम दस्तुर यांनी दिली. नाशिक गुंतवणूकदारांचे प्रमाण २८ टक्क्यांनी वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. (Nashik preference in mutual funds 28 percent increase in investment in 5 years Nashik Latest Marathi News)

यूटीआय नोंदणीकृत प्रतिनिधी मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, म्युच्युअल फंडात मार्च २०१७ मधील ९.२६ लाख फोलिओवरून ऑक्टोबर २०२२ मध्ये ११. ८६ लाख फोलिओंवर गेली आहे. फोलिओ संख्येत झालेली ही मोठी वाढ लिक्विड फंडमुळे शक्य झाली आहे. मार्च २०१७ मधील आकडेवारी ऑक्टोबर २०२२ पर्यंत ५२ टक्क्यांनी वाढली. भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्र गेल्या पाच वर्षांत दुपटीने वाढले आहे.

या क्षेत्राची व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (एयूएम) मार्च २०१७ मधील १८.३० लाख कोटी रुपयांवरून ऑक्टोबर २०२२ पर्यंत ३९. ५३ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. पेशोतन दस्तूर म्हणाले, बचतीचे आणि गुंतवणुकीचे साधन म्हणून म्युच्युअल फंडाविषयीची जागरूकताही वाढत आहे. गुंतवणुकीला आधुनिक तंत्रज्ञान व सखोल प्रादेशिक व्याप्तीमुळे अर्थव्यवस्थेतील योगदान देण्यासाठी लाभदायक ठरली.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

१० हजार कोटींची वाढ

नाशिकमध्ये गुंतवणूक मार्च २०१७ मधील ५४५० कोटी रुपयांवरून १७७ टक्क्यांनी वाढून ऑक्टोबर २०२२ मध्ये १५, ०७७ कोटी रुपयांवर गेली आहे. नाशिकमधील म्युच्युअल फंड इक्विटी योजनांसाठीचे एएयूएम मार्च २०१७ मधील ३७५२ कोटी रुपयांवरून तिपटीने वाढत ऑक्टोबर २०२२ मध्ये १२, ७४२ कोटी रुपयांवर गेले आहे.

इक्विटी योजनांच्या गुंतवणूकदारांत एसआयपी माध्यमाद्वारे वाढ झाली. या कालावधीत इक्विटी योजनांसाठीच्या एसआयपी खात्यांची संख्या १७९ टक्क्यांनी वाढली, असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT