Women shopping in Tipri, Ghagra at Rajendra Stores in the camp area here esakal
नाशिक

Nashik News : पितृपंधरवड्याच्या मंदीतून बाहेर पडण्याचे वेध; समाधानकारक पावसाचाही बाजारातील उत्सवावर परिणाम

Nashik News : पितृपंधरवडा म्हणजे मंदीचा काळ. अनेक जण या काळात खरेदीसह आर्थिक व्यवहार वर्ज्य मानतात.

सकाळ वृत्तसेवा

विनोद चंदन : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव कॅम्प : पितृपंधरवडा म्हणजे मंदीचा काळ. अनेक जण या काळात खरेदीसह आर्थिक व्यवहार वर्ज्य मानतात. मात्र हाच बाजार जेव्हा नवरात्रोत्सव सुरु होतो तस तसा दसरा आणि दिवाळीपर्यंत फुलत जातो. मालेगाव शहर परिसरात सध्या हेच चित्र आहे. अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी कपडे, तेल, पूजा साहित्य, खाद्यपदार्थ, धार्मिक पर्यटन अशी सगळीच बाजारपेठेच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. समाधानकारक पावसामुळे यंदा बाजाराला मंदीतून बाहेर पडण्याचे वेध लागले आहे. (preparation of navratri festival in malegaon )

श्री गणेश उत्सव संपताच मंडळांची नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. यापूर्वी फक्त शहरी भागात दिसणारे टिपऱ्यांचे वलय ग्रामीण भागातही आहे. गुरुवारी ३ ऑक्टोबरला घटस्थापना करण्यात येणार असून नवरात्र उत्सवाची सुरवात होणार आहे. नवरात्रोत्सवातील भक्तीमय वातावरणात आई देवीची यथाशक्ती मनोभावे स्थापना,पूजा,मांडणी केली जाते. दहा दिवसावर नवरात्र उत्सव येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठा पूजेच्या वस्तूंनी, लांब वात, तेल, दगडी दिवा, देवपळ्याची काडी, कुंकू, हळद, मूर्ती, प्रतिमा यासह अनेक वस्तू विक्रीसाठी सजल्या आहेत.

बाजारात चैतन्य

पितृपंधरवड्यात खरेदीसह आर्थिक उलाढाल मंदावल्यानंतर नवरात्रोत्सवापासून बाजारात तेजीला सुरवात होते. त्यासाठी आतापासून बाजारात टिप्रींचे विविध प्रकार रंगरंगोटी केलेल्या साध्या टिपरी, घुंगरू, बेरींग, अल्युमिनियम, रंगीबेरंगी दोरीच्या टिपऱ्या बाजारात आल्या आहेत. लहान मुली, महिलांचे घागरा, चूनरी, ओढण्या, साज शृंगार,अखंडित नऊ दिवस ज्योत प्रज्वलित ठेवण्यासाठी तेल, माळा, तेल, फुले, रोषणाई, महिलांच्या उपवासाचे पदार्थ, रंगीबेरंगी साड्या, खाद्यपदार्थ, विजेची रोषणाई, कपडे, अशा सगळ्यात बाजारात चैतन्य येणार आहे. कुलस्वामिनी रेणुका देवी, कालिका देवी, चांदवड व गडावरील सप्तशृंगी देवी, वणी याठिकाणी भक्तांची नवरात्र काळात दर्शनासाठी मांदियाळी असते त्यामुळे धार्मिक पर्यटन बहरलेले पहायला मिळणार आहे. (latest marathi news)

''घागरा, चूनरी, देवीचे आरास, डेकोरेशन अशा सगळ्याच बाजारात उत्साह आहे. समाधानकारक पावसाने यावर्षी गणपती व नवरात्र उत्सव नागरिकांनी आनंदात साजरा केला आहे.''- राजेंद्र बाविस्कर, व्यावसायिक, मालेगांव कॅम्प

टिपरीचे प्रकार व दर :

साधी रंगीत ः १० ते २० रुपये जोडी

रंगीबेरंगी डिझाईन ची टिपरी - २० ते ३० रुपये जोडी

घुंगराची टिपरी- ४० रुपये

बेरिंगची फिरणारी ः ५० रुपये जोडी

अॅल्युमिनियमची टिपरी- ६० ते ७० रुपये जोडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT