Health Menstrual Cup news esakal
नाशिक

Menstrual Cup: मेंस्ट्रुअल कपमुळे संभाव्य आजारांना अटकाव; मासिक पाळीत नैसर्गिक साधने वापरण्याकडे महिलांचा वाढता कल!

Menstrual Cup : आजच्या आधुनिक आणि वैद्यकीय क्षेत्रात आपण झपाट्याने प्रगती करतोय तरीही समाजात मासिक पाळीविषयी अनेक गैरसमज आहेत.

हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

Menstrual Cup : भारतात महिलांच्या मासिक पाळीवर आजही उघडपणे बोलले जात नाही. आजच्या आधुनिक आणि वैद्यकीय क्षेत्रात आपण झपाट्याने प्रगती करतोय तरीही समाजात मासिक पाळीविषयी अनेक गैरसमज आहेत. अशात मासिक पाळीदरम्यान आयते सॅनिटरी नॅपकिन पॅड वापरण्यापेक्षा मेंस्ट्रुअल कप (Menstrual Cup )(मासिक पाळी कप) वापरण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. (nashik health care menstrual cup marathi news)

यामुळे निसर्गाची हानी टाळली जात असून संभाव्य आजारांनाही अटकाव होण्यास मदत मिळत आहे. भारतात ३० कोटींपेक्षा जास्त महिलांना मासिक पाळीला सामोरे जावे लागते. विज्ञान आणि प्रगतीच्या युगात आज ग्रामीण व शहरी भागामध्ये बऱ्याच महिला मासिक पाळीदरम्यान डिस्पोसेबल सॅनिटरी पॅड वापरतात.

ह्या सॅनिटरी पॅडमध्ये केमिकल्स आणि प्लास्टिकचा वापर होतो. वापरलेले सॅनिटरी पॅड कुठे टाकावे, त्यांची पूर्णपणे विल्हेवाट कशी लावावी आणि जर आपण ते जाळले तर त्यातून विषारी केमिकल बाहेर येतात. त्यामुळे त्याचा मानवी शरीरावर म्हणजेच आरोग्यावर परिणाम होतो.

भारतात सरासरी प्रत्येक महिला दर महिन्याला १० सॅनिटरी पॅड वापरते. म्हणजे १०×३० कोटी= ३०० कोटी सॅनिटरी पॅडचा कचरा गोळा होतो. सॅनिटरी पॅडमुळे होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावता येत नाही.

कारण ते बायोडीग्रीडेबल नसते. शिवाय त्याला जाळले तर त्यातून विषारी वायू बाहेर येऊन वायू प्रदूषण होते. वापरलेल्या सॅनिटरी पॅडच्या वजनाचा हिशोब केला तर तर ३० कोटी महिलांचे सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा ९०० मे. टन एवढा म्हणजे ३२ फुटबॉलचे स्टेडीयम भरतील एवढा होतो. (latest Marathi News)

मेंस्ट्रुअल कप म्हणजे काय

मेन्स्ट्रुअल कप हे एक मेडिकल ग्रेड सिलिकॉनपासून बनलेले वैद्यकीय साधन आहे. हे लवचिक असल्यामुळे योनीमार्गात सोप्या पद्धतीने घालता येते. १२ तासांपर्यंत लिक फ्री प्रोटेक्शन असते. मेंस्ट्रुअल कप सोबत धावणे, प्रवास करू शकता, पोहू शकता, योगा, जिम करू शकता.

एक मेन्स्ट्रुअल कप सहजपणे ५ ते ६ वर्ष वापरता येतो म्हणून हे पर्यावरणासाठी उपयुक्त ठरते. मेन्स्ट्रुअल कप पुन्हा वापरण्यास योग्य असून त्याचा कचरा निर्माण होत नाही. मेन्स्ट्रुअल कप वन टाइम इन्व्हेस्टमेंट असून डिस्पॉझेबल सॅनिटरी नॅपकिन व टॅमपॉन पेक्षा स्वस्त आहे.

मेन्स्ट्रुअल कप मासिक स्त्राव शोषून न घेता गोळा करते. स्त्राव त्वचेच्या संपर्कात येत नाही म्हणून कपमुळे कोणत्याही प्रकारचे रॅशेश, संक्रमण होत नाही. कप योनी मार्गात सील बंद असते म्हणून मासिक पाळीच्या दरम्यान कसलाही वास वा दुर्गंधी येत नाही.

''मेन्स्ट्रुअल कप हा मासिक पाळी दरम्यान वापरला जाणारा सध्याचा आधुनिक पर्याय आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. महिलांना होणारे संभाव्य आजार यापासून संरक्षण होऊन पाळीचा अनुभव आनंददायी घेता येऊ शकतो. त्यामुळे सध्या महिलांची क्रेझ आणि गरज या बाबत वाढत आहे.''- अश्विनी चौमाल, पिरियड पहेली या सहेली उपक्रम, नाशिक

''महिलांनी मासिक पाळीवर मोकळेपणाने संवाद साधून आधुनिक साधने वापरायला हवीत. मासिक पाळीत कॉटन कपडा वा मेन्स्ट्रुअल कप हा आरोग्यवर्धक पर्याय असू शकतो. अभ्यासानुसार एकंदरीत शहरी भागातील महिला या आधुनिक साधनांचा वापर करतात. प्लास्टिक विरहित साधने वापरायला हवीत.''- सोनाली सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT