V. N. Naik Institution Election esakal
नाशिक

V. N. Naik Institution Election : कुणी घेतय ग्रामसभा, कुणाची व्‍यक्‍तिगत भेटींची रणनीती; सायंकाळी उशिरापर्यंत प्रचार सुरू

Institution Election : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या निवडणुकीत चारही पॅनलकडून दिवस-रात्र पिंजून काढला जातो आहे.

सकाळ वृत्तसेवा

V. N. Naik Institution Election : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या निवडणुकीत चारही पॅनलकडून दिवस-रात्र पिंजून काढला जातो आहे. कुणी ग्रामसभा घेताना आपली भूमिका विशद करत असून, काहींकडून सभासदांच्‍या व्‍यक्‍तिगत भेटींची रणनीतीचा अवलंब केला जात आहे. माघारीच्‍या अंतिम दिवशी शनिवारी (ता. १३) पॅनलची घोषणा केल्‍यानंतर लागलीच प्रचाराला सुरवात झाली होती. (Promotion continues till late evening of V N Naik Institution Election )

मर्यादित कालावधीत सर्व सभासदांपर्यंत पोचण्यासाठी चारही पॅनलकडून परिश्रम घेतले जात आहेत. यामुळे रोज सकाळी आठपासून प्रचाराला सुरवात करताना रात्री नऊपर्यंत प्रचारात सक्रिय राहात असल्‍याचे चित्र आहे. प्रगती पॅनलकडून गेल्‍या दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या गावांना भेटी देताना तेथील मंदिरांमध्ये ग्रामसभांचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून पॅनलची भूमिका विशद करताना आगामी काळातील विकासाचे धोरण सभासदांपुढे मांडले जात आहे.

परिवर्तन पॅनलच्‍या माध्यमातून सध्याच्‍या कार्यकारिणीच्‍या कारभारातील त्रुटी मांडताना वारसांना सभासदत्‍व देण्यासह इतर विविध मुद्द्यांवर प्रचार करत आहेत. तसेच नवीन शिक्षणक्रम सुरू करणार असल्‍याचेही आश्‍वासन दिले जात आहे. क्रांतिवीर विकास पॅनलच्‍या माध्यमातून सोमवारी प्रचार कार्यालयाचे उद्‍घाटन करण्यात आले. यासोबत दिवसभर पॅनलचे उमेदवार गावोगावी भेट देताना गत पाच वर्षांमध्ये केलेली कामे व भविष्यातील कामांचे व्‍हिजन मांडले जात आहे.

नवऊर्जा पॅनलकडून निवडणुकीत प्रचार करताना सभासदांच्‍या वैयक्‍तिक भेटींना प्राधान्‍य दिले जात आहे. आत्तापर्यंतच्‍या कार्यकारिणींच्‍या कामकाजातील त्रुटी मांडताना पॅनलकडून आगामी काळात संस्‍थेच्‍या विकासाचे धोरण या वेळी मांडले जात आहे. एकंदरीत चारही पॅनल पूर्ण झोकून देत अधिकाधिक सभासदांपर्यंत आपली भूमिका पोचविण्यासाठी सर्वच पर्यायांचा अवलंब करत आहेत. (latest marathi news)

सरचिटणीस पदाचे उमेदवार म्‍हणतात...

''सभोवतालच्‍या संस्‍थांसोबत तुलना केल्‍यास नाईक संस्‍थेची प्रगती खुरडलेली असल्‍याचे बघायला मिळते. यासंदर्भात सभासदांपर्यंत वस्‍तुस्‍थिती मांडताना आमच्‍या पॅनलमधील युवा, शिक्षित उमेदवारांचे संस्‍थेविषयीचे धोरण वैयक्‍तिक भेटीतून मांडतो आहोत.''- अभिजित दिघोळे, नवऊर्जा पॅनल

''राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्‍या अनुषंगाने आगामी काळात आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. त्‍यामुळे अनुभव असलेल्‍या जुन्‍या सहकाऱ्यांसोबत ऊर्जा असलेले नवे सहकारी असा समतोल साधत पॅनलचे धोरण सभासदांसमोर मांडतो आहोत. ग्रामसभांतून सभासदांशी संवाद सुरू आहे.''- हेमंत धात्रक, प्रगती पॅनल

''यापूर्वी २००४ पर्यंत संचालक म्‍हणून काम केलेले असताना, तसेच त्‍यानंतर लोकप्रतिनिधी असताना वेळोवेळी संस्‍थेच्‍या समस्‍या सोडवणुकीस प्राधान्‍य दिले आहे. संस्‍थेत नवीन अभ्यासक्रम सुरू करताना मृतांच्‍या वारसांना सभासदत्‍वाचे आश्‍वासन देत आहोत.''-बाळासाहेब सानप, परिवर्तन पॅनल

''शंभर वर्षांची परंपरा असलेली वंजारी समाजाची मातृसंस्‍था असलेल्‍या नाईक शिक्षण संस्‍थेला शैक्षिण धोरणासह अनेक आव्‍हानांना सामोरे जायचे आहे. गुणात्‍मक प्रगती साधताना २०५० पर्यंतचा ‘शैक्षणिक कृतिआराखडा’ सभासदांसमोर मांडत आहोत.''-शिवाजी मानकर, क्रांतिवीर विकास पॅनल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT