नाशिक

एक्स्पोचा आज समारोप

CD
वाढावा पान मेन ---------------------------- 31275 धुळे : अग्रसेन हॉलमधील नरेडको नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ ला भेट देणाऱ्या नागरिकांची गर्दी. -- धुळ्यात एकाच छताखाली ३० हून अधिक गृहप्रकल्पांची माहिती नरेडको प्रॉपर्टी एक्स्पोचा आज समारोप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३ : नाशिकमध्ये स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धुळेकर नागरिकांसाठी नरेडको नाशिक आयोजित नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. दोन ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या तीन दिवसीय एक्स्पोचा रविवारी (ता. ४) शेवटचा दिवस असून, नागरिकांनी धुळे शहरातील पांझरा नदीकाठच्या छत्रपती महाराज अग्रसेन हॉलमधील एक्स्पोला सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत भेट द्यावी, संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नरेडको नाशिकने केले आहे. नाशिकमधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे सरासरी ३० स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. यामुळे नागरिकांना विविध बजेट, गरजा आणि पसंतीनुसार घरांचे अनेक पर्याय एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत. घर खरेदी, नवीन गृहप्रकल्प, गुंतवणूक तसेच नाशिकमधील आगामी विकासाच्या संधींबाबतची माहिती थेट बांधकाम व्यावसायिकांकडून घेण्याची संधी या प्रदर्शनातून उपलब्ध झाली आहे. -------------- विकासाच्या नवसंधी नाशिक हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. आगामी कुंभमेळा, वाढता औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील योगदान आणि येथील आल्हाददायक वातावरण यामुळे नाशिकमध्ये भविष्यात विकासाच्या आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे धुळेकरांनी आपल्या गरजेनुसार योग्य घराची निवड करण्यासाठी रविवारी या एक्स्पोला भेट द्यावी. धुळे शहरात नाशिकमधील विविध गृहप्रकल्पांची माहिती मिळत असल्याने, नागरिकांना प्रत्यक्ष नाशिकला जाण्यापूर्वी विविध प्रकल्पांची तुलना करण्याची आणि आपल्या बजेटनुसार घर निवडण्याची मोठी सोय झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

SCROLL FOR NEXT