Zilla Parishad employees protesting by putting up black ribbon for the demand of old pension. esakal
नाशिक

Old Pension Scheme : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी काळ्या फिती लावत आंदोलन! जिल्हा परिषदेने वेधले शासनाचे लक्ष

Nashik News : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. १) काळ्या फिती लावून काम करीत शासनाचा निषेध नोंदविला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. १) काळ्या फिती लावून काम करीत शासनाचा निषेध नोंदविला. मुख्यालयाबाहेर येत कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. जिल्हा परिषद मुख्यालयासह सर्व पंचायत समित्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारी, जिल्हा परिषद-निमसरकारी. (Old Pension Scheme)

शिक्षक-शिक्षकेत्तर व चतुर्थ श्रेणी कर्मचारी राज्य समन्वय समितीला गेल्या संपावेळी मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच आर्थिक व सामाजिक लाभाची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अधिसूचना काढण्याची घोषणा विधिमंडळात केली होती.

त्याला आठ महिन्यांचा दीर्घ कालावधी उलटूनही राज्य शासनाने योजना लागू करण्यासंदर्भात कार्यवाही केली नाही. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली सर्व संवर्ग जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांनी एकजुटीने मुख्यालयातील कर्मचारी.

सर्व पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी तसेच क्षेत्रीय स्तरावरील आरोग्य, ग्रामसेवक, शिक्षक, पशुचिकित्सा कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तालुकास्तरावर सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, मुख्य सचिव यांना निवेदने देण्यात आली. (latest marathi news)

तत्काळ निर्णय न घेतल्यास ९ ऑगस्टला दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद व सर्व पंचायत समिती कार्यालयांसमोर सर्व एक तास धरणे देऊन तीव्र निदर्शने आंदोलन करतील, असा इशारा संघटनांनी दिला आहे. आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार हळदे.

डॉ. भगवान पाटील, विक्रम पिंगळे, अजित आव्हाड, महेंद्र पवार, अनिल गिते, निवृत्ती बागड, राजेंद्र येवला, योगेश गोळेसर, श्रीरंग दीक्षित, अजय कस्तुरे, संदीप गावंडे, कानिफ फडोळ, भास्कर कुवर, किशोर वारे, दिनकर सांगळे, रवींद्र गायकवाड, सागर गांगोडे, अर्चना गांगोडे, चारुशीला भोसले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT