protest  esakal
नाशिक

Nashik Protest News : ‘ईव्हीएम’विरोधात उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Nashik Protest : आगामी लोकसभेची निवडणूक ईव्हीएम मशिनऐवजी मतदान पत्रिकान्वये घेण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी (ता. २९) गोल्फ क्लब येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Protest News : आगामी लोकसभेची निवडणूक ईव्हीएम मशिनऐवजी मतदान पत्रिकान्वये घेण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी (ता. २९) गोल्फ क्लब येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी बाराला निघणाऱ्या मोर्चामध्ये संविधानप्रेमी वकील नाशिक जिल्हा, संविधान सन्मान वकील समिती, सीटू, भारतमुक्ती मोर्चा, बहुजन रिपब्लिकन पार्टी यांच्यासह शेतकरी संघटना व विविध क्षेत्रांतील संघटना सहभागी होणार आहेत. (Nashik Protest March marathi news)

जगभरात असलेल्या लोकशाही स्वीकारलेल्या देशामध्ये ईव्हीएम मशिनचा वापर मतदानप्रक्रियेत केला जात नाही. जर्मनीसारख्या प्रगत देशातही ईव्हीएमविरोधात याचिकेची दखल घेत मतदान पत्रिकेनुसार मतदानप्रक्रिया सुरू करण्यात आली.

मात्र भारतात तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष वगळता सर्वांनी ईव्हीएमद्वारे मतदान बंदची मागणी केली आहे. (latest marathi news)

त्याच मागणीनुसार, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या वेळी ॲड. बंडूनाना डांगे, ॲड. प्रभाकर वायचळे, ॲड. सुजाता चौदंते, ॲड. नीलेश सोनवणे, कृष्णा शिलावट, राम बागूल, रवींद्र कांबळे आदी उपस्थित होते. ईव्हीएमविरोधात देशभरातील संविधानप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रिकेनुसार मतदानप्रक्रिया सुरू न केल्यास प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएम मशिन फोडण्यात येईल, असा इशारा सुजाता चौदंते यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : 40 वर्षे लढून मिळवलेल्या कोल्हापूर सर्कीट बेंच विरोधात याचिका, पण एका सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण निकाली

Sahyadri Tiger : ताडोबासारखे सह्याद्री व्याघ्र दर्शन कधी? जंगल सफारीची वाढती मागणी

'नितीश कुमारजी तुमचं धोतर खेचलं तर...' बुरखा खेचण्यावरुन राखी सावंत भडकली, जाहीर माफीची केली मागणी

तुझा फोन पडला, तर मला सांगू नको... Jasprit Bumrah ची चाहत्याला तंबी अन् मग हिसकावला मोबाईल; Viral Video

भाडं मागायला आली मालकीण, भाडेकरू दाम्पत्यानं गळा दाबून संपवलं; सूटकेसमध्ये लपवला मृतदेह

SCROLL FOR NEXT