नाशिक

सात पिकअपमधून १६ बैलांची वाहतूक

CD
पिकअपमधून गोवशांची वाहतूक नाशिक रोड पोलिसात ११ संशयितांविरोधात गुन्हा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : नाशिक रोड पोलिसांनी नाशिक - पुणे मार्गावर सापळा रचून गोवंशाची वाहतूक करणाऱ्या सात पिकअप वाहनांना ताब्यात घेतले. या वेळी दाटीवाटीने या वाहनातून १६ गोवंशाची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. संशयित चालकांकडे या वाहतुकीसंदर्भात कोणतेही परवाने नसल्याने गोवंशाची सुटका करीत गोशाळेत दाखल केले, तर संशयित ११ जणांविरोधात नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड पोलिसांना गोरक्षकांनी पोलिसांनी पिकअपमधून कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक केली जात असल्याची खबर दिली होती. त्यानुसार, रविवारी (ता. २५) पहाटे फुलेनगर येथे सापळा रचला होता. संशयित एका पाठोपाठ एक सात पिकअप सिन्नरच्या दिशेने जात असताना पोलिसांनी ते रोखले. या सातही पिकअपमध्ये तब्बल १६ गोवंश जनावरे दाटीवाटीने कोंबून भरलेली होती. याप्रकरणी संशयितांकडे चौकशी केली असता, त्यांनी जनावरे ही सिन्नरच्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. परंतु त्यांच्याकडे सरपंच वा ग्रामसेवकाचा कोणताही परवाना नसल्याने ११ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुरलीधर तुकाराम वाघले (३९, रा. पळशी बु., ता. पेठ), जयराम भास्कर नाठे (४२, रा. पाडे, ता. दिंडोरी), निवृत्ती मधुकर खोडे (३०, रा. रोहिले, ता. त्र्यंबक), करण रतन गांगुर्डे (२६, रा. ब्राह्मणवाडी, ता. त्र्यंबक), श्रीकांत रतन गांगुर्डे (२८, रा. कासार, ता. शहापूर, जि. ठाणे), मोतीराम हरी वाघमारे (४५, रा. गावंडे, ता. पेठ), गंगाराम हनुमंत गवळी (६५, रा. करंजाळी, ता. पेठ), हेमराज पंडित पागी (२६, रा. शिंगदरे, ता. पेठ), शरद बाबूराव भांगरे (३८, रा. पिंपळवटी, ता. पेठ), ज्ञानेश्वर मखल भांगरे (२८, रा. पिंपळवटी, ता. पेठ), कमलाकर रामदास भोये (२९, रा. कुलवंडी, ता. पेठ) अशी संशयितांची नावे आहेत. तपास हवालदार मोरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Issue : पुण्यातील पाणीकपात वाढविण्याची गरज नाही; सजग नागरिक मंचाची मागणी

Pune News : दुष्काळात ज्वारीच्या बियाण्यांचे पाठबळ! पावसावर लागवडीचे क्षेत्र ठरणार; शेतकऱ्यांना मिनीकिटचे वाटप

Maharashtra Live News: पादचारी मार्ग अन् खड्डे बुजविण्यासाठी ११६ कोटी

Pune Crime : बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड; पाच लाख ६४ हजारांच्या नोटा जप्त

भारत-नेदरलॅंड्स व्यापार दुप्पट होणार; डच परराष्ट्र व्यापारमंत्री स्जूर्ड्समा यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT