Pune University esakal
नाशिक

Nashik News : संलग्‍नता तपासा, माहितीची पडताळणी करा..! पुणे विद्यापीठातर्फे प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी सूचना जारी

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेशासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्‍या सूचना जारी केल्‍या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेशासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्‍या सूचना जारी केल्‍या आहेत. त्‍यानुसार प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्‍या संलग्‍नतेची तपासणी करायची आहे. इतर आवश्‍यक माहितीची पडताळणीही विद्यार्थ्यांनी करायची आहे. नंतर उद्‌भवणारे संभाव्‍य वादविवाद टाळण्यासाठी विद्यापीठाने सूचना जारी केल्‍या आहेत. ( Pune University has issued notification for students regarding admission)

पुणे विद्यापीठाशी संलग्‍न महाविद्यालयाच्‍या तसेच मान्‍यताप्राप्त परिसंस्‍थांच्‍या माध्यमातून पदविका, पदवी तसेच पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने सूचना जारी केली आहे. सध्या परीक्षांची लगबग सुरू असली तरी दुसरीकडे विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षा यापूर्वीच झालेल्या आहेत. तसेच काही परीक्षांचे निकालही जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसांतच आणखी काही अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी घेतलेल्‍या सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशोच्छु विद्यार्थ्यांसाठी सूचना जारी केली आहे.

सर्व भार विद्यार्थ्यांवर नको...

प्रवेश कालावधीत कागदपत्रांची जमवाजमव करणे, शुल्‍कासाठी र‍कमेची तजवीज करणे यात विद्यार्थी व पालक व्‍यस्‍त असतात. अशा परीस्‍थितीत आणखी अतिरिक्‍त जबाबदाऱ्या पार पाडायच्‍या कशा, असा सवाल उपस्‍थित केला जात आहे. सूचनापत्रकातील काही बाबी विद्यार्थी व पालकांना सजग करण्यासाठी व त्‍यांच्‍या हितासाठी आहेत. ही गोष्ट मान्‍य असली तरी महाविद्यालयांची संलग्‍नता तपासणी, प्रवेश नियंत्रण समितीच्‍या संकेतस्‍थळावर नोंदणीसंदर्भात पडताळणीसह इतर काही मुद्दे क्‍लिष्ट असल्‍याने त्‍यासंदर्भातील जबाबदारी विद्यार्थ्यांवर टाकायला नको, अशी अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे. (latest marathi news)

प्रवेशासंदर्भात पुणे विद्यापीठातर्फे जारी सूचना अशा

- प्रवेशापूर्वी संबंधित अभ्यासक्रमास विद्यापीठाची संलग्‍नता असलेल्‍या पत्राची खातरजमा करावी

- व्‍यावसायिक अभ्यासक्रमांबाबत महाविद्यालयाची माहितीची पडताळणी संबंधित प्रवेश नियंत्रण समितीच्‍या संकेतस्‍थळावरून करावी

- प्रवेश निश्‍चित करण्यापूर्वी विहित पात्रता धारण करत असल्‍याची खातरजमा करावी

- प्रवेशासाठी वापरला जाणारा पासवर्ड, ई-मेल, ओटीपी आदी कुणालाही शेअर करू नये

- अभ्यासक्रमाची मान्‍यता व निर्धारित शुल्‍काची खातरजमा करावी

- शुल्‍क महाविद्यालयाच्‍या खात्‍यामार्फतच भरावे. वैयक्‍तिक बँक खात्‍यावर शुल्‍क जमा करू नये

- ‘संयुक्‍तिक ऑफर व्‍हॅल्‍यू ॲडिशन एकावर एक मोफत’ अशा योजना विद्यापीठातर्फे दिल्‍या जात नाहीत. त्‍यामुळे प्रलोभनास बळी पडू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याने घेतली उसळी तर चांदी घसरली ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Iran US Conflict: पश्चिम आशियातील तेल निर्यात रोखू; नाकेबंदीनंतर इराणचा इशारा, अमेरिकेच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पर्वती येथील शाहू वसाहत एसआरए प्रकल्पावरील सुनावणी आज; नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

बारामतीत कारची वारकऱ्याला धडक, अपघातात वृद्ध वारकऱ्याचा जागीच मृत्यू

Nagpur Tiger Census: आनंदाची बातमी! नागपूरच्या जंगलात वाघांची डरकाळी; पहिल्याच अधिकृत गणनेत 42 ते 45 वाघांची नोंद

SCROLL FOR NEXT