Rahul Gandhi esakal
नाशिक

Nashik Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा नाशिकमध्ये रोड शो? पोलिसांकडून बंदोबस्तासंदर्भात नियोजन

Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. येत्या आठवड्यात भारत जोडो यात्रा नाशिकमार्गे मुंबईला जाणार आहे.

नरेश हाळणोर : सकाळ वृत्तसेवा

Nashik Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. येत्या आठवड्यात भारत जोडो यात्रा नाशिकमार्गे मुंबईला जाणार आहे. नाशिकमध्ये राहुल गांधी यांचा द्वारका चौक ते शालिमारदरम्यान रोड शो होणार असल्याचे समजते. यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नसले तरी त्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून बंदोबस्त नियोजनासंदर्भात चाचपणी केली जात आहे. (Nashik Rahul Gandhi road show in Nashik marathi news)

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ईशान्य भारताकडून भारत जोडो यात्रा सुरू झालेली आहे. ही यात्रा सध्या बिहारमध्ये असून, नागरिकांचा मोठा प्रतिसाद यात्रेला मिळतो आहे. ही यात्रा आठवड्यात मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात दाखल होत आहे. १२ मार्चला जिल्ह्यात ही यात्रा प्रवेश करेल. मालेगावात राहुल गांधी यांचा रोड शो आणि सभा होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर १४ तारखेला राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल होतील. नाशिकमध्येही द्वारका चौक ते शालिमारदरम्यान राहुल गांधी यांचा रोड शो होणार असल्याचे समजते. या रोड शोसंदर्भात आयोजक व पोलिस यांच्यात बैठका सुरू असून, पोलिस बंदोबस्ताच्या नियोजन, सुरक्षात्मक आढावा यानंतर या रोड शोवर शिक्कामोर्तब होणार आहे. (latest marathi news)

रोड शोनंतर राहुल गांधी हे पंचवटीतील श्री काळाराम मंदिरातही जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनेही नियोजन केले जात आहे. काँग्रेसचे इतर पदाधिकारी सध्या नाशिकमध्येच तळ ठोकून आहेत. शहर-जिल्ह्यातून जाणाऱ्या भारत जोडो यात्रेबाबत येत्या दोन दिवसांत अंतिम आराखडा निश्चित केला जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पोलिस झाले सतर्क

खासदार राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेदरम्यान उडवून देण्याची धमकी देणारा संशयित माथेफिरू नाशिकमधील असल्याचे काही दिवसांपूर्वीच निष्पन्न झाले होते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणाही सतर्क झालेली आहे. पोलिसांची गोपनीय यंत्रणाही सजगतेने शहर-जिल्ह्यातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT