Crops in the field perished due to lack of rain esakal
नाशिक

Nashik Rain Crisis: नांदगाव तालुका दुष्काळाच्या सावटाखाली; खरिपातील उत्पन्नात घट?

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Crisis : महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने आता परतीच्या वेळी तरी आसुसलेल्या नांदगाववर कृपादृष्टी दाखवावी अशा भाबड्या आशेने बळीराजा आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे.

यातच तालुक्यातील तिन्ही कृषी मंडळातील पिकांचे उत्पन्न पंधरा टक्क्याच्या आसपास पोचते की नाही यासंबंधीचे चित्र प्राथमिक नजर आणेवारी नंतर स्पष्ट होणार आहे.

एकूणच सध्या तालुका भयावह दुष्काळाच्या सावटाखाली आहे. (Nashik Rain Crisis Nandgaon taluka under drought Decline in income in Kharif season)

नांदगाव तालुक्यात मागील एक ते दीड महिन्यापासून पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पाऊस नसल्याने पिके जगवायची कशी असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.

यातच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होऊ लागली आहे. या सर्व गोष्टींच्या पाश्‌र्वभूमीवर आमदार सुहास कांदे यांनी टंचाई सदृश्यतेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतल्यानंतर यंत्रणेकडून पिकांच्या प्राथमिक नजरवारीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

त्याचा अहवाल देखील शासनाला देण्यात आले आहे. आता तालुक्याचे लक्ष लागले आहे ते कमी पावसामुळे खरिपाच्या उत्पन्नात किती घट झाली याकडे.

तालुक्यात सरासरीच्या निम्मा देखील पाऊस न झाल्यामुळे परिणाम खरीपावर झाला आहे. यामुळे केवळ २० टक्काच्या आत खरिपाचे उत्पन्न मिळेल असा प्राथमिक अंदाज असून त्याची प्राथमिक नजर आणेवारी देखील कमी असेल.

त्यात पाऊस आज उद्या पडेल या आशेने पिके जगविण्याचा प्रयत्न करूनही केवळ पाण्याअभावी ती होरपळून जाऊ लागली आहे. काढणी नंतर खरे उत्पन्न स्पष्ट होणार आहे. महसूल विभागाचा प्राथमिक नजर आणेवारीचा अहवाल कधी जाहीर होतो. याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाणी टंचाई जाणवणार

तालुक्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात टँकरची मागणी आली. ऐन पावसाळ्यात नवसारी, शास्त्रीनगर, बोयगाव या गावात टँकरच्या पाच फेऱ्या सुरु झाल्या. सोळा जूनला खादगाव, धोटाणे खुर्दसाठी टँकरच्या चार फेऱ्या सुरु झाल्या.

त्यानंतर पाऊस पडल्यानंतर टँकर बंद होतील असा अंदाज होता. मात्र तो चुकला. उलट जुलै महिन्यात टँकर कमी होण्याऐवजी त्यात वाढ झाली. सद्यःस्थितीत तालुक्यात टँकरची संख्या अकरावर असून ऑगस्ट अखेरीस त्यात पुन्हा वाढ होऊन १९ गावे, ५५ वाड्या वस्त्यांना दररोज ४४ फेऱ्या माराव्या लागत आहे.

सप्टेंबर मध्ये देखील टँकरच्या मागणीत वाढ होणार असा एकूण आहे. जलाशयातील उपयुक्त साठे कधीच संपुष्टात आले असून मृत साठ्यात देखील दिवसेंदिवस घट होत आहे.

"यंदा तालुक्यावर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे सर्व मिळून त्याचा मुकाबला करू. या अशा संकटकाळात जनतेचा सेवक म्हणून सोबत आहे. धीर सोडू नका यंत्रणा शेतकरी असा समन्वय ठेवण्यात येईल." - सुहास कांदे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT