Dagu Katkade while spinning a rotavator on a soybean crop. esakal
नाशिक

Nashik Rain Crisis: सोयाबीन पिकावर फिरवला रोटावेटर! कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याने उचलले पाऊल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Crisis : पावसाची ओढ, पिकांवर पडलेली कीड आणि होणारा खर्च पाहून पानेवाडी (ता. नांदगाव) येथील शेतकऱ्याने सोयाबीनच्या उभ्या पिकात रोटावेटर फिरवला.

पेरलेल्या पिकामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली असल्याचे सांगत शेतकऱ्याने हे पाऊल उचलले. (Nashik Rain Crisis Rotavator turned on soybean crop step taken time came for debt market nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पानेवाडी ( ता. नांदगाव) येथील शेतकरी दगू कातकडे यांनी यांनी आपल्या दोन एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. पिकाची योग्य ती काळजी घेतली होती. पीक जोमात होते. परंतु पिकावर रोग पडल्याने फवारणी करावी लागली.

पिकांवर आलेल्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी महागडी कीडनाशक घेऊन फवारणी केली. मात्र काही दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने पीक येते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

इतका खर्च करूनही सोयाबीन पिकाला पाहिजे त्याप्रमाणात फलधारणा न झाल्याने तसेच सोयाबीनच्या शेंगामधील दाणे परिपक्व होण्यापूर्वीच पीक पिवळे पडून लागल्याने फवारणी करून काहीच उपयोग होणार नसल्याने आणि पेरणी ते काढणी पर्यंतचा खर्च पाहता दुसरे पीक तरी हातात येईल या आशेने शेतकऱ्याने सोयाबीनच्या उभ्या पिकात रोटावेटर फिरवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Weather Alert : पुढचे ८ दिवस इशारा! पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस, विदर्भात उष्णतेची लाट; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला

रुपया पुन्हा घसरला! सार्वकालिक नीचांकी पातळीवर, ७९ पैशांनी कोसळून ९५.२८ वर

IPL 2026: हैदराबाद-गुजरातमध्ये प्लेऑफ निश्चित करण्यासाठी हातघाईची लढाई; कशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन?

Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात वाढ, १ जानेवारीपासूनचा फरक मिळणार

Nida Khan: निदा खानला १४ दिवसांची कोठडी; एसआयटीकडून आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू, ‘पॉश’ कायद्याचे उल्‍लंघन..

SCROLL FOR NEXT