Tanaji Daund spinning the rotor in the papaya garden esakal
नाशिक

Nashik Rain Crisis: पाऊस नसल्याने पपईवर फिरविला रोटर

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Crisis : महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाच्या परतीच्या आशा मावळू लागल्याने तळवाडे येथील शेतकरी तानाजी दोंड यांनी अगतिक होत दोन एकरातील पपईच्या बागेवर रोटर फिरविला.

मोठ्या उमेदीने लावलेल्या पपई बागेसाठी नाशिकहून त्यांनी एका नर्सरीतून रोपे आणली होती. लागवडीच्या टप्प्यात त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. (Nashik Rain Crisis Rotor turned on papaya due to lack of rain)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

साधारणतः सात ते आठ लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी त्यांना खात्री होती. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने बाग सुकू लागली. शेततळ्यातील पाण्यावर कशीबशी उभी राहिलेली बागेला फुलोरा बहरला होता.

मात्र आता पाण्याची कमतरता भासू लागली होती. जून गेला, जुलै संपला, ऑगस्टमध्येही पावसाने जेमतेम हजेरी लावल्याने तेवढ्यापुरता ओलावा मिळाला. बहराला आलेली झाडे कोमेजू लागली मग हळूहळू फुलोरा धरलेले पपई पीक करपू लागले.

त्यामुळे आता या झाडांचे काय होणार, या विवंचनेत असणाऱ्या दौंड यांनी नाइलाजाने शेतात रोटावेटर चालविला. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी पपईच्या बागेतील पीक काढून टाकले. या घटनेने तालुक्यातील दुष्काळाची दाहकता मात्र अधोरेखित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Explained: दूध प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT