nashik rain esakal
नाशिक

Nashik Rain Update: शहरात 40 दिवसांच्या खंडानंतर पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : वरूणराजा रूसल्याने शहर व परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे.

पावसाच्या थेंबाला आसुसलेल्या शहर व परिसरात चाळीस दिवसांच्या खंडानंतर बुधवारी (ता.६) सायंकाळी हलक्याशा पावसाने हजेरी लावली. (Nashik Rain Update City receives rain after 40 day break)

यापूर्वी शहर व परिसरात २७ जुलैला अखेरचा पाऊस झाला होता. त्यावेळी देखील फक्त डोंगराळे, कौळाणे नि., जळगाव व निमगाव मंडलात पाऊस झाला होता. यावेळी सरासरी ५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

तालुक्यात आज अखेर फक्त १३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आगामी काळात सलग जोरदार पाऊस झाल्यास किमान पिण्याचे पाणी व चारा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यासाठी हातभार लागणार आहे.

शहरात दोन दिवसाआड तर ग्रामीण भागात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. धरणे, नदी, नाले, गावतळी कोरडीठाक आहेत. यामुळे शेतकरी, कामगार, शेतमजूर, व्यवसायिक व सर्वच घटक ' पड रे पाण्या ' अशी आळवणी करीत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

२७ जुलैला झालेल्या पावसाची मंडलनिहाय स्थिती (मिलीमीटरमध्ये)

मालेगाव ०२.००

दाभाडी ०१.००

अजंग ००.००

वडनेर ०६.००

करंजगव्हाण ०४.००

डोंगराळे १३.००

झोडगे ०१.००

कळवाडी ०४.००

कौळाने नि ११.००.

जळगांव नि. ०७.००.

सौदाने ००.००

सायने ००.००

निमगाव १०.००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Boat Accident : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT