Damanganga  
नाशिक

Nashik Rain Update : मुसळधार पावसाने दमनगंगा दुथडी भरून

राम खुर्दळ

गिरणारे/गंगापूर (जि. नाशिक) : तीन दिवसांपासून मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक कोरड्याठाक पडलेल्या नद्या, नाले, वाहू लागले. या भागातील गंगापूर, कश्यपीचा पाणीसाठा ही वाढत असला तरी गुजरात-महाराष्ट्र सीमेवर दमण गंगेच्या काठावर असलेल्या श्री क्षेत्र दावलेश्वर (ता. त्रंबकेश्वर) देवस्थान दमनगंगेच्या पुरात मनसोक्त बुडले होते. (Damanganga river is flooded due to torrential rains)

या ठिकाणी असलेल्या ४५ फूट उंचीचा हनुमानाची उभी मूर्तीच्या कंबरेपर्यंत पुराचे पाणी आले होते. दरम्यान आषाढी एकादशीला सुरू झालेला उशिरा आलेल्या पावसाने पश्चिम पट्ट्यात हरसूल, भूत मोखाडा रस्त्यावर दरड कोसळल्या, तर या भागातील भाताची आवणी केलेली उभी पिके पाण्याखाली गेली असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान जूनपासून दडी मारून बसलेला पाऊस पश्चिम पट्ट्यात दोन दिवसांपूर्वी वाघेरा, वेळूनजे, हरसूल, ठाणापाडा, खरशेत, भागात धो-धो बरसला, जणू ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने या भागातील प्रमुख नदी असलेली दमनगंगेला पूर आला होता,पुरात नदीकाठची आजूबाजूची शेती होती व दावलेश्वर येथील महादेव मंदिर जोतिर्लिंग, तसेच हभप वैकुंठवासी बापूबाबांचे स्मृतीसमाधीमंदिर पाण्यात होते. एकूणच हा महापूर होता असे स्थानिक शेतकऱ्यांनी संगितले.

पाऊस उशिरा आल्याने रखडलेल्या आवण्या मोठ्या जोमात सुरू झाल्या मात्र बुधवार पासून जोरदारपणे बरसणाऱ्या पावसाने मात्र भात आवणी केलेल्या शेतात तलाव झाला होता,तर त्यामुळं कित्येक भात शेती वाहून ही गेली. दरवर्षी भात पिकाला ग्रहण लागते,त्यात या पावसाने खरशेत रस्त्यावर असलेल्या दमनगंगेला महापूर आला होता.या पुरात तीर्थ दावलेश्वर मंदिरांसह परीसर पाणीमय होता.तास धबधबा ओसंडून वाहत होता. - देवचंद महाले (शेतकरी)

(Damanganga river is flooded due to torrential rains)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT