Girna Dam esakal
नाशिक

Nashik Rain Update: गिरणाचा जलसाठा 10 हजार दशलक्ष घनफुटावर

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : कसमादेत पावसाचा रुसवा-फुगवा सुरुच आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर गेल्या आठवड्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली.

विशेषत: हरणबारी, चणकापूर, पुनंद, केळझर या धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा व मोसम या दोन्ही प्रमुख नद्यांना प्रथमच या हंगामात पुर आले. (Nashik Rain Update girna dam water at 10 thousand million cubic feet)

याठिकाणी सुरु असलेल्या पावसामुळे हरणबारीतून ५२३ क्युसेक पाणी मोसम नदीत तर चणकापूरमधून ३६७ क्युसेक पाणी गिरणा नदीपात्रात वाहत आहे. पुरपाण्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेल्या गिरणा धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ असून धरण ५४ टक्के भरले आहे.

गिरणा धरणाची साठवण क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट आहे. यातील ३ हजार दशलक्ष घनफूट मृत साठा आहे. गेल्या तीन वर्षापासून धरण शंभर टक्के भरत आहे. यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे गिरणा, मोसमला हंगामातील पहिला पुर येण्यास सप्टेंबर उजाडला. पावसाळ्यातील तीन महिने पुरेसा पाऊस झाला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कसमादेतील हरणबारी, चणकापूर, पुनंद, केळझर ही धरणे भरल्यानंतरच गिरणातील जलसाठा वाढतो. हरणबारी वगळता इतर तीनही धरणे उशिरा भरली.

कसमादेतील धरणे भरल्यानंतर त्यांच्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे गिरणा व मोसम या दोन्ही नद्यांना पुरपाणी येते. पुरपाण्यातूनच गिरणा धरणाचा जलसाठा वाढतो.

गिरणा धरण ५४ टक्के भरल्याने मालेगावसह खानदेशचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. पावसाळा अजून महिनाभर आहे. या कालावधीत चांगला पाऊस झाल्यास धरणातील जलसाठा आणखी वाढू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; जनता वसाहत टीडीआर प्रकरणाला शासनाची स्थगिती

Miraj Minor Ganja : झटपट पैसे मिळवण्याचा नाद बेक्कार! मिसरुट न फुटलेली पोरंही गांजा विकताहेत; मिरजेत अल्पवयीनांकडून दोन किलो गांजा जप्त

Umesh Patil: स्वबळ ठरलेच तर शिवसेनेसह इतरांना सोबत घेऊ: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील; सामान्य नागरिक, कार्यकर्ता राष्ट्रवादीसोबतच..

Nilesh Ghaywal Case : निलेश घायवळ प्रकरणात आता ईडीची एन्ट्री; जमीन व्यवहारातील कोट्यवधींच्या उलाढालीचा तपास होण्याची शक्यता

Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस सरकार संकटात? 'नोव्हेंबर क्रांती'च्या चर्चांना वेग, डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार?

SCROLL FOR NEXT