Sant Nivruttinath Palkhi  esakal
नाशिक

Sant Nivruttinath Palkhi : निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहकुटुंब सहभागी होणार! त्र्यंबकेश्‍वराचे घेणार दर्शन

Nashik News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत:, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे हे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत:, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे हे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे गुरुवारी (ता. २०) त्र्यंबकेश्‍वर येथून प्रस्थान होत आहे. त्यादृष्टीने ठाकरे कुटुंब बुधवार (ता. १९)पासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत असल्याने मनसेसैनिक तयारीला लागले आहेत. (Raj Thackeray family will participate in Nivruttinath palkhi ceremony)

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत, त्यादृष्टीनेही राज ठाकरे यांचा दोनदिवसीय दौरा महत्त्वपूर्ण ठरेल. या पार्श्‍वभूमीवर मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. १६) ‘राजगड’ या पक्ष कार्यालयात आढावा बैठक घेतली.

प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, महिला सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे उपस्थित होते. (latest marathi news)

राज ठाकरे त्र्यंबकेश्‍वर येथून निघणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यात सहभागी होतील. तत्पूर्वी, त्र्यंबकेश्‍वर मंदिरात त्र्यंबकराजाचे दर्शनही घेणार आहेत.

येथील सर्व वारकरी, दिंडीला सदिच्छा भेट देणार असल्याचे त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे व जिल्हा सचिव भूषण भुतडा यांनी सांगितले. दरम्यान, राज ठाकरे मनसेसैनिकांना काय मार्गदर्शन करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT