Rajaram Pangavane speaking at the meeting held for the preparation of road show of NCP President Sharad Pawar and Rahul Gandhi. Sarpanch Bhaskarrao Bankar, Dilip More and others are neighbors. esakal
नाशिक

Rahul Gandhi, Sharad Pawar Nashik Daura: शरद पवार, राहुल गांधी यांच्या सभेस रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार : पानगव्हाणे

Nashik Daura: लोकसभा निवडणुकीच्या पा‍वर्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निफाडला व काँग्रेसचे युवानेते राहुल गांधी यांचा पिंपळगाव बसवंत, ओझर येथील रोड शोला रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमेल.

सकाळ वृत्तसेवा

Rahul Gandhi, Sharad Pawar Nashik Daura : ब्रिटिश राजवटीनंतर भारत दुसऱ्यांदा भाजप सत्तेच्या निमित्ताने स्वातंत्र्य गमावून बसणार आहे. ही हुकूमशाही व जुलमी राजवट उखडून फेकण्याची संधी येत्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. त्या पा‍वर्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निफाडला व काँग्रेसचे युवानेते राहुल गांधी यांचा पिंपळगाव बसवंत, ओझर येथील रोड शोला रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमेल. (nashik rajaram Pangavhane statement of Sharad Pawar and Rahul Gandhi meeting will see record breaking crowd marathi news)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडविण्यासाठी दोन्ही नेत्यांचे आगमन हा शंखनाद ठरेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची १३ मार्चला निफाडला सभा व काँग्रेसचे युवानेते राहुल गांधी यांचा १४ मार्चला पिंपळगाव, ओझर येथे होणाऱ्या रोड शोच्या पूर्वनियोजनासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

सरपंच भास्करराव बनकर, पिंपळगाव सोसायटीचे अध्यक्ष दिलीप मोरे उपस्थित होते. पानगव्हाणे म्हणाले, की शेतकरीविरोधी धोरण व दलित-आदिवासीसाठी दिशाभूल करणाऱ्या योजना राबविणाऱ्या भाजपमुळे देशातील प्रत्येक नागरिक त्रस्त आहे. सरपंच बनकर म्हणाले, की पवार व गांधी यांची सभा व रोड शोला उच्चांकी गर्दी झाल्यास दिंडोरी लोकसभेचा गड सर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मनोबल वाढेल. (latest marathi news)

महाविकास आघाडीची बाजू अधिक सक्षम व भक्कम करण्यासाठी दोन्ही नेत्यांचे आगमन फलदायी ठरणार आहे. भाजपला हद्दपार करण्याची ही संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. राजेंद्र मोगल म्हणाले, की निफाड तालुक्यातील पवार, गांधी यांच्या स्वागताला होणारी उपस्थिती राज्यात शुभसंकेत देऊन जाणार आहे.

पिंपळगाव सोसायटीचे अध्यक्ष दिलीप मोरे यांनी पवार, गांधी यांचे स्वागत, सभा अभुतपूर्व होणार असल्याचे सांगितले. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्‍वर चव्हाण, तालुकाध्यक्ष विजय जाधव, चंद्रकांत खोडे, सोमनाथ मोरे, राजा गांगुर्डे, सुरेश जाधव, मधुकर शेलार, प्रकाश अडसरे, साहेबराव डेरे, अमोल बागूल, आरिफ काझी, दत्तू मोरे, सुनील बाफना आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT