All rangoli artists after drawing an attractive rangoli of Lord Ganesha by Sai Art Academy, Malegaon city. esakal
नाशिक

Rangoli Business : रांगोळीमुळे वाढतेय कार्यक्रमाची शोभा! 'संस्कृती' संवर्धनासह कलाकारांना मिळतोय रोजगार

Nashik News : अलीकडे रांगोळी कला हा प्रकार स्वतंत्रपणे शिकवला जात असून युवकांचाही सहभाग वाढला असून या कलेच्या माध्यमातून अनेकांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे.

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर : रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते. संस्कृतीच्या परंपरेत रांगोळीला फार महत्त्व आहे. पूर्वीपासून प्रत्येक घरी देवघरापासून पासून ते अंगणापर्यंत रांगोळी टाकल्याशिवाय घराला घरपण येत नाही.

अलीकडे आधुनिकीकरणाच्या काळात ही संस्कृती मोठ्या प्रमाणावर जपली जात आहे .विविध कार्यक्रमांसाठी 'रांगोळीची क्रेझ' वाढली आहे. रांगोळी काढणाऱ्या महिलेला फार महत्त्व असायचे. मात्र अलीकडे रांगोळी कला हा प्रकार स्वतंत्रपणे शिकवला जात असून युवकांचाही सहभाग वाढला असून या कलेच्या माध्यमातून अनेकांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. (nashik Artists getting employment with promotion of culture by rangoli news)

कार्यक्रम आयोजन करणाऱ्या कंपनीतर्फे आता कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी रांगोळीला स्वतंत्र स्थान मिळाले आहे. छोट्या कार्यक्रमासह आता मोठ्या शहरातील अनेक कार्यक्रमामध्ये प्रवेशद्वारावर रांगोळी हवी अशी मागणी वाढत आहे. यामुळे रांगोळीचे विविध प्रकार बघायला मिळू लागले आहे.

याला तंत्रज्ञानाची देखील जोड मिळत असून अनेक रंगसंगतीमध्ये आकर्षक आणि देखण्या रांगोळ्या कलाकारांकडून साकारल्या जात आहे. यातच अनेक कलाकारांनी काढलेल्या रांगोळ्यांनी विक्रम देखील रचले आहे. रांगोळींमुळे अनेक कलाकरांना एक वेगळी ओळख देखील मिळू लागली आहे.  (latest marathi news)

यामध्ये मालेगावचे रांगोळी कलाकार देखील आपले नशीब या क्षेत्रात आजमावू लागले आहे. अनेक रांगोळी स्पर्धेत येथील कलाकारांनी बक्षीसे मिळविली आहे. कर्नाटक, केनिया राजस्थान तेलंगना ,लंडन या देशात ऑनलाइन संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांहून रांगोळी प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळवत आहेत.

"सध्या रांगोळीची मोठी क्रेझ आहे. रांगोळीमध्ये वस्तू चित्र, निसर्ग चित्र, व्यक्ती चित्र, आत्ता सद्या थ्रीडी रांगोळी प्रचलित आहे. या कलेचे शिक्षण घेण्यासाठी देशभरातून विद्यार्थी मालेगावला येत आहे. असंख्य कलाकारांनी मार्गदर्शन घेऊन स्वतःचा उदर निर्वाह रांगोळीने सुरू केला आहे. आज रांगोळी कला अल्पजीवी कला असली तरी अनेकांना आश्चर्य चकित करणारी प्रमुख आकर्षक केंद्र ठरत आहे."- प्रमोद आर्वी, रांगोळी प्रशिक्षक

"चित्रकला क्षेत्रातील अनेक जण बेरोजगार आहेत. आपल्या कलेच्या माध्यमातून रांगोळी या क्षेत्रात वळल्यावर रोजगार लाभला आहे. पण कलेची मजूरीला अजूनही मोल होत नसल्याची खंतही वाटते. कला ही पोटापाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. रांगोळीची क्रेझ सातासमुद्रापार वाढत असल्याने आनंद वाटतो."- दिनेश निकम, रांगोळी कलाकार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT