oxygen esakal
नाशिक

नाशिकमध्ये तिसऱ्या लाटेची तयारी : ऑक्सिजन साठा, व्यवस्थापनाकडे लक्ष केंद्रित

महेंद्र महाजन

नाशिक : कोरोनाग्रस्त (corona virus) रुग्णांच्या संख्येत (patients) दिवसेंदिवस घट होत असताना नाशिकसाठी उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनचे (oxygen) प्रमाण वाढत आहे. अशा एका उसंत घेण्याच्या अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालयातील ऑक्सिजन व्यवस्थापन विभागातर्फे आता ऑक्सिजन साठा आणि त्याच्या व्यवस्थापनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याची सुरवात आपत्कालीन परिस्थितीसाठी १६ टन ऑक्सिजनचा साठा करण्यापासून झाली आहे. याशिवाय २० आणि १३ अशा ३३ टनाच्या टाक्या ऑक्सिजनच्या साठ्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत. (nashik ready for corona third wave)

ऑक्सिजन साठा, व्यवस्थापनाकडे लक्ष केंद्रित

ऑक्सिजन आला की वापरायचा आणि टँकर मिळण्यास विलंब झाल्यावर ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत प्रश्‍न निर्माण व्हायचा. त्यामुळे रुग्णालयांना रुग्ण हलवायला लागले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील या भयानक अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर तिसऱ्या लाटेची ऑक्सिजन उपलब्धतेची नेमकी काय स्थिती आहे, ही बाब अन्न-औषध प्रशासनच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांच्याकडून जाणून घेतली. कोरोना रुग्णांच्या तुलनेत ऑक्सिजन अधिकचा उपलब्ध असला, तरीही ऑक्सिजन मिळवण्यासाठी रोजचे प्रश्‍न वेगवेगळे असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले. जेएसडब्ल्यूकडून पाच टन ऑक्सिजन मिळतो. पण पाच टनाचा टँकर नसल्याने तीन दिवसांतून हा ऑक्सिजन उपलब्ध होतो. तसेच जामनगरच्या ‘रिलायन्स’मधून मिळणाऱ्या ऑक्सिजनसाठी अडीच दिवसांचा वेळ लागतो. त्यामुळे आगामी काळात रुग्णसंख्या वाढल्यावर पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यादृष्टीने ऑक्सिजन साठा आणि व्यवस्थापनाचे सूत्र पुढे आले आहे.

थेट रुग्णालयांना ३० टक्के ऑक्सिजन

महापालिकेच्या दोन आणि खासगी सहा अशा एकूण आठ रुग्णालयांना उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनपैकी ३० टक्के ऑक्सिजन उपलब्ध होतो. उरलेला ऑक्सिजन इतर रुग्णालयांना दिला जातो. गुरुवारी (ता. १३) नाशिकसाठी १११ टन ऑक्सिजनची उपलब्धता झाली. याशिवाय अन्न-औषध प्रशासनातर्फे हवेतून ऑक्सिजननिर्मितीची परवानगी दिलेल्या चार प्रकल्पांतून २१.७ टन ऑक्सिजन उपलब्ध झाला. अशा एकूण १३२.७ टन ऑक्सिजनची उपलब्धता झाली. त्यातील १६ टन ऑक्सिजन साठवून ठेवण्यात आला आहे. रुग्णालयांना थेट २७ टन ऑक्सिजन पुरवण्यात आला. रिफलर कंपन्यांसाठी ८४ टन ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे.

रुग्णालय आणि उत्पादकांकडे साठा

भविष्यात वाढणाऱ्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर साठवणूक आणि व्यवस्थापनाच्या सूत्राद्वारे रुग्णालयांप्रमाणेच ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडे ऑक्सिजनचा साठा करण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय आणखी टाक्या उपलब्ध होतात काय? याचा शोध घेण्यात येत आहे. त्यातून आला की ऑक्सिजन वापरायचा याऐवजी गरजेपेक्षा अधिकचा साठा राखून ठेवायचा आणि आपत्कालीन परिस्थिती वापरायचा, असे प्रयत्न राहणार असल्याची माहिती श्रीमती पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: ११ लाख नाही फक्त एक लाख दुबार मतदार, मुंबईत मतदारांची छाननी; पालिकेचे तंत्रज्ञानाधारित मॉडेल यशस्वी

Latest Marathi News Live Update : केवळ तपास म्हणजे छळ नव्हे; सीबीआयविरोधातील याचिका फेटाळत नागपूर खंडपीठाचे स्पष्ट निरीक्षण

Nandgaon News : मिरची तोडल्याच्या आरोपावरून नांदगावच्या मजुरांवर जीवघेणा हल्ला; महिलांवर अत्याचाराचाही प्रयत्न

Ashes : इंग्लंडने अखेर लाज वाचवली, चौथी कसोटी दुसऱ्या दिवशी जिंकली; ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभव अन् WTC Point Table बदलले

Gajkesari Yog Lucky Rashi 2026: नवीन वर्षात ‘या’ राशींचे नशीब पलटणार, 'गजकेसरी राजयोग' देणार मोठं यश

SCROLL FOR NEXT