Nashik temperature of 37 degrees Celsius esakal
नाशिक

Nashik News : सलग तिसऱ्या दिवशी पाऱ्यात घसरण

Nashik News : नाशिकचे किमान तापमान थेट ४२ अंश सेल्सिअसवर पोचले होते. त्‍यानंतर मात्र पाऱ्यात किरकोळ घसरण सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्‍या बुधवारी नाशिकचे किमान तापमान थेट ४२ अंश सेल्सिअसवर पोचले होते. त्‍यानंतर मात्र पाऱ्यात किरकोळ घसरण सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरत शनिवारी (ता.२५) नाशिकचे कमाल तापमान ३७.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर किमान तापमान २४.९ अंश सेल्सिअस राहिले. पाऱ्यात घसरण झाली असली तरी उकाड्यात घट झालेली नाही. (recorded maximum temperature of 37 degrees Celsius)

उन्‍हाळ्याच्‍या झळा सोसतांना नाशिककरांची चांगलीच कसोटी लागते आहे. या वेळी प्रखर सूर्यकिरणांचा सामना करणे आव्‍हानात्‍मक ठरते आहे. राज्‍यभरात उष्मा वाढलेला असताना, नुकताच नाशिकचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर पोचला होता. तसेच अनेक वेळा नाशिकचे कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले गेले होते.

दिवसा सूर्य आग ओकत असताना, रात्रीदेखील उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. आकडेवारीच्‍या दृष्टिकोनातून काहीशी दिलासादायक स्‍थिती आहे. गेल्‍या तीन दिवसांपासून पार्यात सातत्‍याने घसरण सुरू आहे. आगामी आठवडा हा तप्त उन्‍हाबाबत आव्‍हानात्‍मक ठरणार आहे. (latest marathi news)

खंडित वीजपुरवठ्याने उकाड्यात भर

शनिवारी शहरातील अनेक भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. आधीच उकाड्याने त्रस्‍त असलेल्‍या नागरिकांमध्ये यामुळे मनस्‍तापात भर पडत होती. पंखा, एसी किंवा कुलरशिवाय उकाड्याचा सामना करणे मुश्‍कील असताना.

वीजपुरवठा खंडित झाल्‍याने असह्य झाल्‍याची भावना नागरिकांमध्ये होती. काही मिनिटांसाठीदेखील पंखा, एसी, कुलर बंद झाल्‍यास अस्‍वस्‍थ झाल्‍याची भावना निर्माण होत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT