National Panchayat Raj Award esakal
नाशिक

Nashik News : केंद्र शासन राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारासाठी जिल्ह्यातील एक हजार 385 ग्रामपंचायतींची नोंदणी

Nashik News : केंद्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची नोंदणी पूर्ण झाली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : केंद्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची नोंदणी पूर्ण झाली असून, १०० टक्के नोंदणी करणारा नाशिक जिल्हा राज्यात प्रथमस्थानी असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. (National Panchayat Raj Award)

२०२२-२३ आर्थिक वर्षासाठी हे पुरस्कार असून, २०२२-२३ वर्षाच्या कामकाजावर पंचायत राज संस्थांना पुरस्कार मिळणार आहे. केंद्र शासनातर्फे पंचायत राज अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्थांना पुरस्कार दिले जातात. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामस्तरावर हे पुरस्कार देण्यात येतात.

यासाठी या वर्षी जिल्ह्यातील एक हजार ३८५ ग्रामपंचायतींची नोंदणी पूर्ण झाली आहे. दोन ग्रामपंचायती नवीन असल्याने त्यांना अद्याप एलजीडी कोड प्राप्त नाही. २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात असलेल्या सर्व एक हजार ३८५ ग्रामपंचायतींची १०० टक्के नोंदणी करण्यात आली आहे. (latest marathi news)

ही नोंदणी करण्यासाठी १० जुलै ही शेवटची मुदत होती. मात्र मित्तल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली व गटविकास अधिकारी यांच्या सनियंत्रणाखाली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ९ जुलैला रात्रीच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची नोंदणी पूर्ण करून घेतल्याने नाशिक जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT