Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : लाचखोर उपअभियंता सोनवणेच्या निलंबनासाठी अहवाल मागितला

Nashik News : सुरगाणा उपविभागात कार्यरत असलेल्या वर्ग-१ च्या लाचखोर उपअभियंता नंदलाल विक्रम सोनवणे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडे पाठविण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागांतर्गत सुरगाणा उपविभागात कार्यरत असलेल्या वर्ग-१ च्या लाचखोर उपअभियंता नंदलाल विक्रम सोनवणे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाने मागविला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लागलीच निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल. (Report sought for suspension of corrupt sub engineer Sonawane)

उपअभियंता नंदलाल सोनवणे यास ४० हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी पकडण्यात आले. २० लाख रुपये खर्चाच्या दोन वेगवेगळ्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी दोन टक्के याप्रमाणे तक्रारदाराकडे प्रत्येकी २० हजार, अशी ४० हजारांची लाच मागण्यात आली होती. पथकाने मुंबई नाका प्लेसमेंट परिसरातील त्यांचे निवासस्थान असलेल्या गायकवाडनगरमध्ये त्यांना लाच स्वीकारताना पकडले.

अटक झाल्यानंतर आता सोनवणे यांना निलंबित करण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाला वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा अधिकार आहे. हा अधिकारी वर्ग-१ मधील असल्याने त्यांचा प्रस्ताव शासनाकडे संबंधित विभागाकडे पाठवावा लागणार आहे. (latest marathi news)

त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सामान्य प्रशासन विभागास अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी लागलीच बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता पंकजकुमार मेतकर यांच्याशी संपर्क करत, त्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

सोनवणे यांच्यावरील कार्यवाहीचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून येतो. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मेतकर सविस्तर तयार करून प्रशासनाला सादर करतील. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती श्री. परदेशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT