Nashik Lok Sabha Constituency  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीकडून स्ट्रॉग रूममध्ये प्रतिनिधी

Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या वतीने प्रतिनिधींची नियुक्ती करण्याची केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दक्षिण नगर व बारामती लोकसभा मतदारसंघातील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर संशय व्यक्त केल्यानंतर नाशिक लोकसभा मतदार संघातील मत पेट्या ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या तेथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या वतीने प्रतिनिधींची नियुक्ती करण्याची केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. (Representative from Maha Vikas Aghadi in Strong Room)

बारामती येथील स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे ४५ मिनिटांसाठी बंद पडले होते तर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या मतपेट्या ज्याचे ठेवण्यात आल्या तेथे संशयितपणे काही व्यक्ती फिरत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. नाशिक लोकसभा मतदार संघाच्या मतपेट्या ज्या स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आले आहे, येथे देखील संशय व्यक्त करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे मतमोजणी होईपर्यंत प्रतिनिधींची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिनिधींची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. (latest marathi news)

सीसीटीव्ही कक्षामध्ये सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत सूरज वाजे, विक्रम वाजे तसेच नियंत्रण कक्षात कैलास वाजे, आनंदा वाजे यांची नियुक्ती करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत सीसीटीव्ही कक्षामध्ये अनिल पवार व चंद्रकांत वाजे तर नियंत्रण कक्षात पंढरीनाथ वारुंगसे.

योगेश वामने व संकेत वाजे यांची तर रात्री नऊ ते सकाळी सात या वेळेत नियंत्रण कक्षात पंकज वाजे, विकास शिंदे तर सीसीटीव्ही कक्षामध्ये ऋषिकेश वारुंगसे व विकास वारूंगसे यांची नियुक्ती करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Muhurat Trading : दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स-निफ्टी वधारले, अनेक शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा उच्चांक

Hinjewadi IT Park : जिथे रोज वाहनांच्या लांबच लांब रांगा, तिथे आता रस्ते मोकळे; दिवाळीच्या सुट्यांनी हिंजवडीतील वाहतुकीचे चित्र बदलले

Pune News: दिवाळीच्या दिवशीच शिंदे कुटुंबावर संकट! नवीन गॅस सिलिंडर जोडताच स्फोट, घरातील सर्व साहित्य जळून खाक

Phaltan News: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! आई-वडिलांसोबत झोपलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा श्वानाच्या हल्ल्यात मृत्यू, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Live Update: : मंत्र्यांची अनोखी दिवाळी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंत्री उदय सामंत यांनी नांदेडमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी

SCROLL FOR NEXT