nashik news esakal
नाशिक

Nashik News : 84 हजार मुलांची सुटका; देशभरात रेल्वे सुरक्षा दलाकडून संभाव्य धोक्यापासून मुला-मुलींचे संरक्षण

Nashik : रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) सात वर्षांपासून ‘नन्हे फरिश्ते’ अभियान प्रभावीपणे राबवीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) सात वर्षांपासून ‘नन्हे फरिश्ते’ अभियान प्रभावीपणे राबवीत आहे. भारतीय रेल्वेच्या देशभरातील विविध विभागांमध्ये काळजी आणि सुरक्षेची (२०१८-२०२४), रेल्वेस्थानके आणि रेल्वेगाड्यांमधून संकटात सापडलेल्या ८४ हजार ११९ मुला- मुलींची सुटका करून संभाव्य धोक्यापासून त्यांचे संरक्षण केले आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’च्या आरंभासह २०१८ हे वर्ष महत्त्वाचे ठरले. (Rescue of 84 thousand children Protection of boys and girls from possible danger by Railway Security Force )

या वर्षात ‘आरपीएफ’ने एकूण १७ हजार ११२ मुला-मुलींची सुटका केली. २०१८ मध्ये अशा उपक्रमाची तातडीची गरज अधोरेखित करत, या अभियानाचा पाया भक्कम रचला. २०१९ मध्ये ‘आरपीएफ’च्या प्रयत्नांना फळ मिळू लागले. या वर्षी एकूण १५ हजार ९३२ मुला-मुलींची सुटका करण्यात आली. कोविडमुळे २०२० हे वर्ष आव्हानात्मक ठरले. ज्यामुळे सामान्य जीवन विस्कळित झाले होते. त्याचा अभियानाच्या कामावर लक्षणीय परिणाम झाला. (latest marathi news)

तरीही या आव्हानांचा सामना करत ‘आरपीएफ’ने पाच हजार अकरा मुला-मुलींची सुटका केली. २०२१ मध्ये ‘आरपीएफ’ने आपल्या बचाव कार्यात आणखी प्रगती करीत ११ हजार ९०७ मुला-मुलींची सुटका केली. २०२२ मध्ये त्यांनी १७ हजार ७५६ मुलांची सुटका केली, जी आतापर्यंतची सर्वाधिक संख्या होती.

या वर्षी घरातून पळून गेलेली आणि हरवलेली मुले मोठ्या संख्येने सापडली. त्यांना आवश्यक ती काळजी आणि संरक्षण देण्यात आले. २०२३ या वर्षात ‘आरपीएफ’ने ११ हजार ७९४ मुलांची सुटका केली. २०२४ च्या पहिल्या पाच महिन्यांत ‘आरपीएफ’ने चार हजार ६०७ मुलांची सुटका केली. यामध्ये घरातून पळून गेलेल्या तीन हजार ४३० मुलांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT