Rasta Roko by Maratha Samaj at vani esakal
नाशिक

Maratha Reservation Case: वणी येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको

Nashik News : मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी रास्ता रोकोची हाक दिली होती.

सकाळ वृत्तसेवा

वणी : मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी रास्ता रोकोची हाक दिली होती. त्यांच्या या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी वणीतील सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. (nashik Maratha community rasta roko at Vani marathi news)

राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पण मनोज जरांगे पाटील यांनी हे आरक्षण फेटाळून लावत मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंबंधी सगेसोयरे अधिसूचनेच्या तत्काल अंमलबजावणीचाही आग्रह धरला आहे.

त्यांच्या निर्देशांनुसार या प्रकरणी निषेध नोंदविण्यासाठी वणीतील सकल मराठा समाजाच्या वतीने येथील महाविद्यालयासमोर सापूतारा - नाशिक रस्त्यावर सकाळी ११ वा. सुमारे अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (Latest Marathi News)

यावेळी दिं. कृ उ.बा. समितीचे सचांलक व ओझरखेड ग्रा. पालिकेचे सरपंच गंगाधर निखाडे यांनी ही उपस्थित मराठा समाजच्या आंदोलकांना मार्गदर्शन करत सरकारवर टिका केली. येणाऱ्या काळात सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घेत मनोज जरांगे सांगतील या प्रमाणे आंजोलनाची पुढील भुमिका ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सकल मराठा समाजाचेवतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले.

तालुकाध्यक्ष बाळासाहेब घडवजे, गणेश देशमुख, सचिन पवार, गणेश कड, राहुल मोरे, काका पवार, संजय कामाले, शशी मातेरे शुभम खांडे, अमोल महाले, प्रविण सोनवणे, सोनू बर्डे, सनी गोलांडे, राजू गोलांडे, नंदू महाले, सचिन कड, दादा पवार, विठ्ठल धोंगडे, सचिन गायकवाड 'दिंडोरी तालुका मेडिकल असोसिएशन सदस्य प्रवीण कड, प्रवीण गायकवाड निखिल महाले, किरण पानसरे, राजू महाले, किरण पानसरे, विजय गोरे, हर्षल कड, रिंकू पाटील आदींनीसह शेकडो मराठा समाज बांधवांनी रास्ता रोकोत सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT