Towing
Towing esakal
नाशिक

टोइंग कर्मचाऱ्यांच्या मनमानीने नाशिककर त्रस्त | Nashik

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील बेशिस्त वाहनचालकांच्या ‘नो- पार्किंग’मधील (No Parking) गाड्या उचलण्यासाठी पोलिसांनी टोइंगसाठी (Towing) ठेका दिला. मात्र, आता टोइंग कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त वर्तनाने वाहनधारक त्रस्त आहेत. शिस्त लावण्याऐवजी केवळ वाहनांच्या दंडाच्या वसुलीवर लक्ष दिले जात आहे. मात्र, जागेवर दंड भरू इच्छिणाऱ्यांना वाहनांच्या मागे पळूनही वाहन मिळत नाही. ठेकेदाराच्या बेशिस्त व उद्धट कर्मचाऱ्यांबाबत वाहतूक पोलिस दुर्लक्ष करीत असल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

शूटिंग तपासले तरी...

नाशिकमध्ये एप्रिलपासून वाहतुकीला अडथळा ठरत नो पार्किंगमध्ये उभी बेशिस्त वाहन उचलण्यासाठी शहर वाहतूक शाखेने ‘श्रमसाफल्य सर्व्हिसेस’ या संस्थेला वाहन उचलण्याचा टोइंग ठेका दिला. वाहन उचलणारे कर्मचारी स्वच्छ निळ्या रंगाच्या गणवेशासह ओळखपत्रासह कार्यरत असावेत. ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांनी गुटखा, तंबाखू सेवन केलेले असू नये. सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत वाहन उचलण्यास परवानगी आहे. वाहन उचलताना काळजीपूर्वक उचलली जावीत, असे अपेक्षित आहे. न उचलल्यास वाहन दुरुस्तीभरपाईचा खर्च टोइंग कंपनीवर निश्चित केला आहे. टोइंग वाहनावर कर्मचारी नेमण्यापासून तर क्रेन, टोइंग वाहनावर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करताना दैनंदिन कामकाजाचे शूटिंग सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे जमा करण्याचे करारात नमूद आहे. म्हणजे, रोजच्या कामकाजाची सीडी वाहतूक विभागात असते. त्यामुळे दिवसभरात काय घडले, हे तपासले तरी अनेक वाहनचालकांना त्रास कमी होणार आहे.

पार्किंग नाही, पण दंड

नाशिक शहरात नो पार्किंगसाठी वाहन टोइंग करीत दंड आकारला जातो. मात्र, दंड आकारण्यापूर्वी शहरात पुरेशा पार्किंगची सोय आहे का, याचा विचार झालेला नाही. अनेक भागात स्मार्टसिटी उपक्रमांतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत. रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना चालताना कसरत करावी लागते. वाहन लावायला पुरेशा पार्किंग स्थळांची सोय नाही. अशा स्थितीत वाहन पार्किंगमध्ये नाही, म्हणून दंड आकारला जातो. आधी पार्किंगची तर सोय करा, अशी वाहनधारकांची मागणी आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

वाहन उचलताना दोन मिनिटे थांबून आणि पाचवेळा पुकारा करण्याचा नियम आहे. संबंधित वाहनधारक जागेवर शासकीय तडजोड शुल्क भरण्यास तयार असेल, तर त्याच्या विनंतीनुसार शुल्क घेऊन वाहन ताबडतोब सोडून द्यावे, अशी करारातील २६ क्रमांकाची शर्त आहे. मात्र, ही शर्त कायम दुर्लक्षित राहते. वाहन उचलताना त्याचा मालक तेथे असूनही त्याला ठेकेदारचे लोक प्रतिसाद देत नाही. काही जण तर वाहनांमागे पळून विनंती करतात, पण टोइंग वाहन निघून जाते. कॅमेऱ्यात या बाबी दिसत नाही का, वाहनावरील वाहतूक कर्मचारी अशा ठिकाणी डोळेझाक का करतात, हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोनात आई गेली...आता होर्डिंग दुर्घटनेमध्ये २१ वर्षीय कमावता भरत गेला, राठोड कुटुंबावर काळाचा घाला

Marathi News Live Update: ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी

"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणत्या क्षेत्रात खरेदी?

GPT-4o : मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो, व्हिडिओ पाहून सगळं ओळखतो.. Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT