rain nashik esakal
नाशिक

नाशिककरांना जोरदार पावसासाठी २१ दिवसांची प्रतीक्षा

महेंद्र महाजन

नाशिक : मध्य प्रदेश अन् छत्तीसगडमधील काही भागासह बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेशात मॉन्सून सक्रिय आहे. शुक्रवार (ता. १८)पासून कोकण पूर्ण, मुंबई व पुढे इगतपुरी, धुळे, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभर मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांचा आहे. दुसरीकडे मात्र नाशिककरांना चांगल्या पावसासाठी आणखी २१ दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता अभ्यासकांना वाटत आहे.

कोकण, मुंबई, इगतपुरी, धुळ्यात आजपासून मुसळधारेचा अंदाज

दिल्ली, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेशमध्ये मॉन्सून २५ ते ३० जूनला सक्रिय असण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी २५ जून ते १ जुलैला कोकण पूर्ण, मुंबई, पालघर, विदर्भात सर्वत्र सर्वसाधारण पावसाची, तर इतरत्र तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढे २ ते ८ जुलैला कोकण, विदर्भात मध्यम पावसाचा अभ्यासकांचा अंदाज आहे. ९ ते १५ जुलैला कोल्हापूर, पुण्याचा काही भाग, नगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, अमरावती जिल्ह्यात कमी, तर नाशिकसह राज्यातील इतर भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. मॉन्सूनच्या अभ्यासानुसार राज्यात १५ जुलै ते १५ ऑगस्ट या काळात अधिकच्या पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र अपेक्षित आहे. त्याच अनुषंगाने राज्यातील बहुतांश धरणे भरण्याची चिन्हे दिसत आहेत.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने केले स्पष्ट

राज्यात १५ ते २५ ऑगस्टला पावसाचा खंड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत राज्यात सर्वत्र पाऊस होईल, असाही अंदाज आहे. परतीच्या पावसाबद्दल ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याकडून अपेक्षा असल्या, तरीही हवामानातील बदलाच्या आधारे पावसाचा नेमकेपणाने अभ्यास होईल, असे अभ्यासक सांगताहेत. दरम्यान, दक्षिण अरबी समुद्र ते दक्षिण कोकणापर्यंत असलेले द्रोणीय क्षेत्र विरून गेल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.

खरिपासह फलोत्पादनासाठी नियोजन

कृषिपंढरी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपासह फलोत्पादन क्षेत्रासाठी आतापासून नियोजन करावे लागणार आहे. मॉन्सूनपूर्व पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३५० हेक्टरच्या पुढे खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. या पेरण्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या क्षेत्रावरील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागण्याची चिन्हे आतापासून दिसू लागली आहेत. पावसाचा हवामान अभ्यासकांचा अंदाज पाहता, साठवणुकीत ठेवलेल्या कांद्याला आगामी काळात चांगला भाव मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एवढेच नव्हे, तर ऑक्टोबर छाटणीनंतर शेतकऱ्यांना द्राक्ष उत्पादनासाठी आगामी पावसाचा विचार करावा लागणार आहे. तीच स्थिती भाजीपाला आणि डाळिंब उत्पादनाबद्दल असेल.

२४ तासांत झालेला पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकण, गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये अशी : हरनाई-राजापूर-२०, चिपळूण-१७, कणवकवली, खेड-१५, दोडामार्ग-१४, कुडाळ, लांजा, मुळदे, पेडणे-१३, संगमेश्‍वर-देवरुख-११, माणगाव, मुंबई (कुलाबा), मुरुड, श्रीवर्धन-१०, गगनबावडा-२८. महाबळेश्‍वर-२१, आजरा-१८, राधानगरी-१७, चंदगड-१६, गडहिंग्लज, कऱ्हाड, कोल्हापूर व सांगली-९, भुसावळ, पारोळा, सातारा-१५, गिरणा धरण, जळगाव-४, कोयना (पोफळी-२३.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टची रंगली चर्चा; म्हणाली- शेवटचा दिवस....

Pune Railway Station : दिवाळीत ३५ लाख नागरिकांचा रेल्वे प्रवास; पुण्यातून धावल्या नियमित अन्‌ विशेष ११०० गाड्या

SCROLL FOR NEXT