नाशिक

पेन्शन धारकांना १ तारखेला पेन्शन ऑनलाईन

CD
नाशिक जिल्हा परिषदेच्या निवृत्ती वेतनधारकांना दिलासा आता एक तारखेलाच निवृत्तिवेतन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाला यापुढे विलंब होणार नसून, दर महिन्याच्या एक तारखेला ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात निवृत्ती वेतन जमा होणार आहे. त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्‍वास नाशिक जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनने व्यक्त केला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या स्वाक्षरीनंतर निवृत्ती वेतनाचे बिल कोषागार विभागाकडे सादर केले जाईल. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. या महिन्यात निवृत्ती वेतनाला विलंब झाला असला, तरी पुढील महिन्यापासून नियमितपणे एक तारखेला निवृत्ती वेतन जमा होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे आजारी, पीडित तसेच केवळ पेन्शनवर अवलंबून असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. ही प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, नाशिक पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रकाश थेटे, रवींद्र जाधव, अर्थ विभागातील लिपिक शुभम शेवाळे तसेच नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT