नाशिक

रिक्षा पलटून ९ वर्षांची चिमुरडी गंभीर

CD
रिक्षा उलटून ९ वर्षांची चिमुरडी गंभीर शहरात वेगवेगळ्या तीन अपघातात चौघे जखमी ... सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : वेगवेगळ्या तीन अपघाती घटनांमध्ये चौघे जखमी झाले आहेत. या एका अपघातात रस्ता ओलांडणारी अवघ्या ९ वर्षांची चिमुरडी रिक्षा पलटी होऊन त्याखाली दबल्याने गंभीररीत्या जखमी झाली आहे. तर अन्य दोन घटनांमध्ये तिघे जखमी झाले. आहेत. पहिल्या घटनेत पाथर्डीकडे जाणाऱ्या भरधाव रिक्षाने अचानक ब्रेक मारल्याने रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात रस्ता ओलांडणारी ९ वर्षांची मुलगी रिक्षाखाली दबली. तिचे दोन्ही पाय मोडले आहेत. दृष्टी जसबीरकुमार झंझोट (९, रा. वडनेर गेट) असे गंभीर जखमी चिमुरडीचे नाव आहे. सोमवारी (ता. २) सकाळी वडनेर गेट परिसरात ही घटना घडली. अंबादास सोमनाथ शिरसाट (४५, रा. पाथर्डी) या रिक्षाचालकाविरुद्ध उपनगर ठाण्यात गुन्हा दाखल असून, हवालदार गोसावी तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत ​दिंडोरी रोडवरील सिनर्जी हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या ४४ वर्षीय महिलेला मारुती ईको कारने जोरात धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. दीपाली मच्छिंद्र बोढाई (रा. मखमलाबाद) या २७ ऑक्टोबरला रस्ता ओलांडत उभ्या असताना कारच्या (एमएच ०२ बीवाय ४४८९) चालकाने निष्काळजीपणे गाडी मागे घेऊन त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला व उजव्या पायाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी म्हसरूळ ठाण्यात गुन्हा दाखल असून, हवालदार जगताप तपास करत आहेत. हॉटेल सयाजीसमोर रस्ता ओलांडणाऱ्या रिक्षाला भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे रिक्षाचालकासह एक प्रवासी जखमी झाला आहे. रिक्षाचालक राजेंद्र मंसाराम गांगुर्डे (४८, रा. टागोर नगर) हे रविवारी (ता. १) रात्री १०च्या सुमारास रिक्षात (एमएच १५ जेए ७८८४) प्रवासी घेऊन जात असताना इंदिरानगर बोगद्याकडून येणाऱ्या दुचाकीने (एमएच १५ जेबी ०६१०) रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक राजेंद्र गांगुर्डे व प्रवासी कौस्तुभ खाटवकर यांच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली. याप्रकरणी मुंबई नाका ठाण्यात गुन्हा दाखल असून, हवालदार म्हैसधुणे तपास करत आहेत.

आंदोलन करा, पण ठरावीक वेळेतच! सुप्रीम कोर्टानं स्पष्टच सांगितलं; काय म्हणाले CJI सूर्यकांत?

High Court: भारत धर्मनिरपेक्ष! दिया मिर्झाचा डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा शेअर करा; हायकोर्टानं भाजपला फटकारलं

Pune Bangalore Highway Traffic : राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली किणी टोलनाक्यावर चक्का जाम, पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

'आमच्या लाडक्या नाईकबाई' मालिका बंद होणार? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील वाहतूक कोंडी 4 वर्षांत कमी होणार, देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT