नाशिक

रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या लढ्याला यश

CD
टूडे साठी ------------- रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या लढ्याला यश गुणांक २ आणि फेरसर्वेक्षणाचे आदेश; मोबदला देण्याचे आश्वासन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : नाशिक रिंग रोड प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या दीर्घ लढ्याला मोठे यश मिळाले आहे. आंदोलनाची दखल घेत शासनाने दोन महत्त्वाचे आदेश दिले आहेत. रिंग रोडच्या भूसंपादनात शासनाने गुणांक १ ऐवजी गुणांक २ लागू करण्याचे आणि जिरायती नोंद झालेल्या जमिनींचे प्रत्यक्ष पाहणी करून फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. रिंगरोड बाधित गावांमध्ये गुणांक २ ऐवजी १ लावल्याने शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळत होता. तसेच पाण्याची सुविधा असूनही जमिनींची नोंद जिरायती म्हणून करण्यात आली होती. या त्रुटींविरोधात शेतकऱ्यांनी सातत्याने आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, विकास खरगे, एमएसआयडीसीचे ब्रिजेश दीक्षित, रंजीत हांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण गायकर यांनी पुराव्यांसह तक्रारी मांडल्या होत्या. त्याची दखल घेत शासनाने गुणांक १ ऐवजी गुणांक २ लागू करण्याचे आणि जिरायती नोंद झालेल्या जमिनींचे प्रत्यक्ष पाहणी करून फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पात्र शेतकऱ्यांना बागायती दराने सुधारित मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अशी माहिती छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर यांनी दिली. दरम्यान, मखमलाबाद ते गोवर्धन, विंचूर गवळी येथील अलाइनमेंट बदलणे आणि हायवे क्र. २९ मधील शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्याप्रमाणे मोबदला देण्याची मागणीही लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन शासनाने दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. -------कोट---------- शेतकऱ्यांची एकजूट आणि पुराव्यांसह केलेल्या पाठपुराव्यामुळे न्यायाच्या दिशेने पाऊल पडले आहे. आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत लढा सुरूच राहील. - करण गायकर, अध्यक्ष, शेतकरी कृती समिती. ----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas : "अण्णा, आमच्या लग्नाचं बघा; नोकरी लागेपर्यंत मानधन द्या!"; महायुतीच्या प्रचारसभेत पदवीधर तरुणाची आमदार सुरेश धसांकडे भावनिक साद..!

IND vs NZ 1st T20I : २७ धावांत ४ विकेट्स... संजू सॅमसनचे वादळ दुर्दैविरित्या थांबले अन् टीम इंडियाच्या गटांगळ्या; तिलक, इशान यांनी विश्वास तोडला... Video

Latest Marathi News Live Update : पुढची ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागणार नाही...! अमित शाह यांचा राहुल गांधीवर निशाणा

Viral Video: आईच्या कुशीत मस्ती करणारे वाघाचे बछडे; ताडोबाच्या जंगलातील मायेचा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद

Thyroid Diet Tips: थायरॉईडच्या रुग्णांनी खाण्यापूर्वी विचार करा! 'या' पदार्थांबाबत डॉक्टर काय सांगतात?

SCROLL FOR NEXT