नाशिक

कुंभमेळा आढावा बैठक

CD
फोटो : B05035 नाशिक : रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेताना पालकमंत्री गिरीश महाजन. सोबत महापौर हिमगौरी आडके, आमदार देवयानी फरांदे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व इतर अधिकारी. शहरातील रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करा पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : पावसाने उघडीप दिल्याने आता नाशिक शहरातील प्रलंबित रस्त्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (ता. २) दिल्या. नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात सायंकाळी महापालिकेच्या विविध विकासकामांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. या वेळी महापौर हिमगौरी आडके, आमदार प्रा. देवयानी फरांदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, उपायुक्त प्रदीप चौधरी, विवेक भदाणे, नियोजन उपायुक्त योगेंद्र चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नागरिकांच्या सोयीसाठी ही कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर पालकमंत्र्यांनी भर दिला. विशेषतः घारपुरे घाट ते रामवाडी पूल या अत्यंत महत्त्वाच्या पुलाचे काम प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी दूर करून तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या पुलामुळे त्या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर तपोवन आणि आगरटाकळी येथील मलनिस्सारण प्रकल्पांच्या कामांना गती देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रकल्पांमुळे परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे ते म्हणाले. पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे प्राधान्याने आणि दर्जेदार पद्धतीने बुजवण्याच्या सूचना देताना प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचीही पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश महाजन यांनी दिले. शहरात सध्या सुमारे १८ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू असून या रस्त्यांवरील ९० टक्के युटिलिटीची कामे पूर्ण झाल्याची माहिती यावेळी प्रशासनाने दिली. नोव्हेंबर महिन्यापासून या रस्त्यांचे डांबरीकरण आणि इतर कामांना प्रत्यक्ष वेग येणार आहे. ---चौकट उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त वापर करा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका ते सिन्नर फाटा या मार्गासह शहरातील महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. पावसामुळे झालेला विलंब भरून काढण्यासाठी उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, गंगापूर रोडला समांतर रस्ता करण्याच्या प्रस्तावासाठी महिन्याभरात निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. आमदार देवयानी फरांदे यांनीही शहरातील रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

चेहऱ्यावर नाही, ‘या’ गोष्टींवरून ओळखा माणसाचा स्वभाव; चाणक्य नीती काय सांगते?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

SCROLL FOR NEXT