नाशिक

द्वारका-नाशिकरोड ४५ मीटरचा मार्ग मोकळा होणार

CD
मेन ------------------ द्वारका- नाशिक रोड ४५ मीटरचा मार्ग मोकळा होणार ‘आयएसपी’कडून जागा देण्याची तयारी; महापालिकेकडून माहिती मागविली सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या वाहतुकीचा सर्वात कळीचा मुद्दा ठरलेल्या द्वारका ते दत्तमंदिर, नाशिक रोड या ४५ मीटर रुंद विकास आराखडा रस्त्याच्या कामातील मोठा अडथळा दूर होण्याची चिन्हे आहेत. या रस्त्यासाठी आवश्यक असलेली जमीन हस्तांतरित करण्याची तयारी इंडिया सिक्युरिटी प्रेसने (आयएसपी) दर्शविली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील द्वारका सर्कल ते दत्तमंदिर चौक हा सुमारे ५.६५० किलोमीटर लांबीचा रस्ता सिंहस्थापूर्वी ४५ मीटर रुंद करण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. या मार्गामुळे द्वारका ते नाशिक रोड दरम्यानची नित्याची वाहतूक कोंडी फुटणार आहे. या प्रकल्पाला ३ जून २०२६ रोजी मंजुरी देण्यात आली. त्यासाठी २२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सध्या हा मार्ग २४ ते ३० मीटर रस्ता हक्क क्षेत्रात आहे. प्रस्तावित प्रकल्पात हा रस्ता सहा पदरी करण्याबरोबरच दोन्ही बाजूला दोन पदरी सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) उभारला जाणार आहे. त्यासाठी ४५ मीटर रुंदीचे क्षेत्र महापालिकेने उपलब्ध करून द्यावे, अशी अट महामार्ग प्राधिकरणाने घातली. या अटीनुसार महापालिकेने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली, ९० टक्के जागा ताब्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, या मार्गात केंद्र सरकारच्या अखत्यारीतील गांधीनगर प्रेस, नेहरूनगर वसाहत, आयएसपी रुग्णालय आणि आर्टिलरी सेंटरच्या जागा येत असल्याने भूसंपादनात अडचणी होत्या. महापालिकेने आयएसपीकडे जमीन मागणीचा प्रस्ताव पाठविल्यानंतर आयएसपी प्रशासनाने सिक्युरिटी प्रिंटिंग ॲन्ड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसपीएमसीआयएल), नवी दिल्ली येथील सक्षम प्राधिकरणाला प्रस्ताव सादर केला. कॉर्पोरेशनने महापालिकेकडून अधिक माहिती मागविली आहे. --चौकट अंतिम मंजुरीनंतर हस्तांतराची प्रक्रिया आयएसपी हॉस्पिटल परिसरातील जमिनीचा शासनमान्य दर २५१६.५८ रुपये प्रति चौरस मीटर असला, तरी प्रत्यक्ष बाजारमूल्य दर किती आहे आणि जमीन हस्तांतरणाच्या कराराचा मसुदा काय असेल, याची सविस्तर माहिती सादर करावी, असे पत्र आयएसपीने महापालिकेला दिले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर ती कॉर्पोरेशनकडे पाठवून अंतिम मंजुरीनंतर जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT