नाशिक

रेल्वेगाड्यांना अलोट गर्दी; तासन्तास प्रतीक्षा, वाढीव गाड्याही फुल्ल

CD
पान-३ साठी --------------- CHE26B18074 नाशिकरोड ः दिवाळानिमित्त नाशिकरोड रेल्वे स्थानकावर असलेली गर्दी (छायाचित्र ः अंबादास शिंदे) -------------- रेल्वेला अलोट गर्दी; तासनतासाची प्रतीक्षा जादा गाड्याही फुल्ल ः दिवाळीत गावी जाण्यासाठी प्रवाशांची धडपड -------------- सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता.७ : दिवाळीच्या सुट्यांमुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांची नाशिक रोड रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी उसळली आहे. सातपूर, अंबड, गोंदेगाव आणि सिन्नर येथील औद्योगिक वसाहतींमध्ये कामानिमित्त आलेले परराज्यांतील कामगार तसेच कर्मचारी आणि व्यावसायिक कुटुंबासह गावी रवाना होत आहेत. त्यामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या प्रवाशांनी खचाखच भरून धावत आहेत. ------------- दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, अमृतसर आणि हरिद्वारकडे जाणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक गर्दी आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्या सुरू केल्या असल्या, त्यांनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, गाड्यांमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. अनेक गाड्या रात्री उशिरा किंवा मध्यरात्री येत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह आलेल्या प्रवाशांना स्थानकाबाहेर दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. स्थानकातील प्रतिक्षागृह आणि फलाटांवर गर्दी असल्याने अनेकांनी बाहेरच ठाण मांडले आहे. दिवाळीच्या सलग सुट्यांचा लाभ घेत अनेकांनी धार्मिक आणि पर्यटनस्थळांकडे जाण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नियमित गाड्यांसह विशेष गाड्याही फुल्ल झाल्या आहेत. काही प्रवासी गर्दीमुळे रेल्वेच्या दरवाजाला लटकून प्रवास करण्याचा धोका पत्करत आहेत. अशा प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बलाचे जवान खाली उतरवून सुरक्षित प्रवासाचे आवाहन करीत आहेत. ------------- २०-२ चौकट दिवाळी, छठपूजेसाठी ८२ विशेष रेल्वे दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने व्यापक उपाययोजना केल्या आहेत. विभागातून ८२ हून अधिक विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या असून, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, या प्रमुख स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, तिकीट तपासनीस आणि वाणिज्य पर्यवेक्षक तैनात करण्यात आले आहेत. मुंबई, पुणे येथून नागपूर, गोरखपूर, दरभंगा, बनारस आणि दानापूरसह विविध शहरांसाठी विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. अमरावती- उधना आणि अमरावती- पुणे या विशेष गाड्यांचाही त्यात समावेश आहे. स्थानकांवरील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात चोवीस तास कर्मचारी तैनात आहेत. याशिवाय विभागीय स्तरावर २४ तास कार्यरत वॉर रूम स्थापन करण्यात आला आहे. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत खळबळ! पत्नीने AIच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट? ChatGPTच्या विरोधात खटला दाखल

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Latest Marathi News Live Update: पेनटाकळीच्या पाण्यासाठी नेत्यांची धावपळ; मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच..

Rohit Pathare case : २४ वर्षीय रोहित पठारेला घरातून उचललं, झाडाला बांधून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT