Nashik Road Marathon esakal
नाशिक

Nashik Road Marathon : नाशिक रोड मॅरेथॉन 18 फेब्रुवारीला! येथे करा नोंदणी

मॅरेथॉनची सुरवात व पारितोषिक वितरण समारंभ नाशिक रोड येथील महापालिकेच्‍या शाळा क्रमांक १२५ च्‍या मैदान (ईगल स्पोर्ट क्लब ग्राउंड) येथे होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विषो फिटनेस मंत्रा संस्थेतर्फे नाशिक रोड मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. १८ फेब्रुवारीला तिसऱ्या हंगामातील मॅरेथॉन पार पडणार असून, सहभागासाठी शनिवार (ता.१०) पर्यंत मुदत आहे, अशी माहिती आयोजक विशाल मोटकरी यांनी दिली. (Nashik Road Marathon on February 18 health fitness news)

मॅरेथॉनची सुरवात व पारितोषिक वितरण समारंभ नाशिक रोड येथील महापालिकेच्‍या शाळा क्रमांक १२५ च्‍या मैदान (ईगल स्पोर्ट क्लब ग्राउंड) येथे होणार आहे. देवळाली गाव, लॅम रोड परिसरातून मॅरेथॉन मार्गक्रमण करणार आहे.

मॅरेथॉनच्या माध्यमातून पुरुष, महिला, तरुण, वृद्ध तसेच दिव्यांग नागरिक एकाच व्यासपीठावर येतात. त्यातून सामाजिक समतेची भावना निर्माण होते. नाशिक रोड मॅरेथॉनमध्ये रन फॉर फन अंतर्गत फॅमिली फन रनपासून ते व्यावसायिक स्पर्धेचा समावेश आहे.

यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह विविध वयोगटातील स्पर्धक सहभागी होतील. मॅरेथॉनमध्ये ३, ५ आणि १० किलोमीटरचा समावेश असणार आहे. प्रत्येक सहभागीस बक्षीसे, टी-शर्ट, स्पर्धा पूर्ण करणाऱ्यासाठी पदक, विजेत्यास रोख बक्षीसे ठेवली आहेत.

स्‍पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. त्‍यासाठी https://vishofitnessmantra.com/marathon/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT