accepting the award Railway Station Master R. K. Kuthar  esakal
नाशिक

नाशिकरोड रेल्वेस्थानकाने पटकावली ढाल

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिकरोड : मध्य रेल्वेतर्फे मुंबई येथे ६७ वा महाव्यवस्थापक वार्षिक रेल्वे सप्ताह पुरस्कार (General Manager Annual Railway Week Award) सोहळा झाला. मुंबई आणि नागपूर विभागाने संयुक्तपणे संपूर्ण कार्यक्षमतेची ढाल जिंकली. भुसावळ विभागातील नाशिक रोड स्थानकाने स्वच्छतेसाठी सर्वोत्तम स्थानकाची ढाल पटकावल्याची माहिती नाशिक रोडचे स्टेशनमास्तर आर. के. कुठार यांनी दिली. (Nashik Road Railway Station has shielded the best station for cleanliness Nashik News)

पुरस्कार स्वीकारतेवेळी तेही उपस्थित होते. नाशिक रोडला पुरस्कार मिळाल्याने अधिकारी, कर्मचारी यांनी जल्लोष केला. या आधीही नाशिकरोड स्थानकाला स्वच्छतेमध्ये देशपातळीवर गौरविण्यात आले होते. मुंबई विभागाने भुसावळ विभागांसह संयुक्तपणे सिग्नल आणि दूरसंचार ढाल, पुणे आणि भुसावळ विभागाने संयुक्तपणे स्टोअर्स ढाल, भुसावळ आणि नागपूर विभागाने संयुक्तपणे वर्क्स एफिशिअन्सी (Works efficiency) ढाल जिंकली. कार्यक्षमतेसाठी मुंबई विभागाला चार ढाल मिळाल्या. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, अतिरिक्त महाव्यवस्थापक बी. के. दादाभॉय, प्रधान मुख्य मनुष्यबळ अधिकारी डॉ. ए. के. सिन्हा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अनिल कुमार लाहोटी यांनी कोरोना संकटातही मध्य रेल्वेने केलेल्या उत्तम कामगिरीची माहिती दिली.

सर्व विभागप्रमुख आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापकाचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. १३६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वार्षिक पुरस्कार आणि विभागांना २१ ढाली प्रदान केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : 'आम्ही कुठेही जाणार नाही, सोबत यायचं असेल तर...'; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

सचिन तेंडुलकरसोबत होणाऱ्या तुलनेवर विराट कोहलीने मोठा भाष्य केले; म्हणाला, सचिन पाजी हे...

Parbhani News : जन्म-मृत्यू विभागाचा ढिसाळ कारभार उघड;परभणी जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर; भाजपचा सभात्याग

Pune News: पुण्यात उभे राहणार देशातील पहिले स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र; ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये ८०० कोटींची गुंतवणूक

SCROLL FOR NEXT