नाशिक

नाशिक रोडच्या मुक्तीधाम परिसरात खोदलेल्या खड्ड्यात चारचाकी वाहन अडकले!

CD
फोटो : B18001 नाशिक रोड : खड्ड्यात अडकलेली चारचाकी. -- खोदलेल्या खड्ड्यात अडकली चारचाकी नाशिक रोड, ता.२६ : मुक्तिधाम परिसरात महापालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. सोमाणी उद्यान ते किरण हॉटेलदरम्यान केबलसाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला चेंबर तयार करण्यासाठी खड्डे खोदले आहेत. मात्र, या खड्ड्यांजवळ कोणतेही सूचना फलक किंवा इशारा देणारी व्यवस्था नसल्याने सोमवारी (ता. २६) दुपारी चारचाकी खड्ड्यात अडकली. सुदैवाने या घटनेत चालकाला दुखापत झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मात्र, या खड्ड्यांच्या बाजूला वाहनचालकांना सावध करणारे सूचना फलक किंवा पुरेशी इशारा व्यवस्था नसल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुदैवाने या घटनेत चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, खड्ड्यांजवळ योग्य सूचना फलक आणि सुरक्षिततेची व्यवस्था असती, तर हा प्रकार टाळता आला असता, अशी चर्चा परिसरात होत आहे. काम सुरू असताना नागरिक आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, असा सवाल आता उपस्थित होत आहे. शहरात विविध विकासकामे सुरू असताना रस्त्यांवरील खोदकामाच्या ठिकाणी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर सूचना फलक, बॅरिकेड्स आणि इशारा देणारी व्यवस्था नसल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशात खळबळ! माजी शिक्षणमंत्र्यांना शंभर कोटींच्या लाच प्रकरणात अटक; तामिळनाडू सरकारची मोठी कारवाई

Piyush Goyal : रॉटरडॅम बंदराची हरित दिशा भारताच्या उपयोगाची; गोयल यांनी घेतला आढावा

Google Hiring Tips: गुगलमध्ये नोकरी मिळवायचीये? कंपनीच्या रिक्रूटरनेच सांगितल्या ५ महत्त्वाच्या टिप्स; रिझ्युमेपासून इंटरव्ह्यूपर्यंत सगळं जाणून घ्या !

Maharashtra Live News: ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख देण्याची मागणी

Vande Bharat Sleeper: दिवाळी आधीच धावणार मुंबई-पुणे-बंगळुरू मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन

SCROLL FOR NEXT