shravan month  esakal
नाशिक

Shravan 2024 : श्रावणमासासाठी नाशिक ग्रामीण पोलिस सज्ज; भाविकांना दक्षता घेण्याचे आवाहन

Shravan : नाशिक ग्रामीण पोलिस सज्ज असून, या काळात भाविकांनीही दक्षता घ्यावी, असे आवाहन ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Shravan 2024 : येत्या ५ ऑगस्टपासून श्रावण मासाला प्रारंभ होत आहे. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यातील सोमवारी आणि शनिवारी लाखोंच्या संख्येने भाविक त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नाशिक ग्रामीण पोलिस सज्ज असून, या काळात भाविकांनीही दक्षता घ्यावी, असे आवाहन ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केले आहे. (Rural Police ready for holy Shravan month )

५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर यादरम्यान श्रावण महिना आहे. या कालावधीमध्ये पाच श्रावण सोमवार असल्याने प्रत्येक सोमवारी भाविकांची त्र्यंबकेश्वर येथे गर्दी असणार आहे. विशेषत: तिसऱ्या आणि पाचव्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. यासंदर्भात ग्रामीण पोलिसांकडून चोख नियोजन केलेले आहे. त्याचप्रमाणे, येणाऱ्या भाविकांसाठीही पोलिसांनी सुरक्षिततेसंदर्भात दक्षतेच्या सूचना केलेल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन ग्रामीण अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केले आहे. (latest marathi news)

अशा आहेत भाविकांसाठी सूचना

- भाविकांनी कमीत-कमी सामान बाळगावे
- मौल्यवान चीज वस्तू आणू नये.
- मंदिरात बॅग्ज, पिशव्या नेण्यास मनाई
- बेवारस वा संशयास्पद वस्तु आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा
- संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती द्यावी
- वाहने पार्किंगमध्ये पार्क करावीत
- अफवांवर विश्वास ठेऊ नये

''श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची गर्दी असते. पोलिसांकडून भाविकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत. तरीही भाविकांनी काही सूचनांचे पालन केल्यास त्यांची यात्रा अधिक सुलभ होईल.''- विक्रम देशमाने, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT