jal jeevan esakal
नाशिक

SAKAL Exclusive : नाशिक जिल्ह्यातील जलजीवनच्या 16 योजनांचे काम ठप्प! ZP कडून 125 कामांना मिळाली मुदतवाढ

Nashik News : जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला असला तरी, १६ योजनांचे काम सुरू होऊन बंद पडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला असला तरी, १६ योजनांचे काम सुरू होऊन बंद पडले आहे. यात चांदवड तालुक्यातील सर्वाधिक ५ योजनांचा समावेश आहे. मुदतवाढ देण्याचे विकेंद्रीकरण झाल्यानंतर पाणी पुरवठा (Water Supply) व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक यांनी महिनाभरात सुमारे ८० हून अधिक योजनांच्या कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे. (nashik SAKAL Exclusive jal jeevan marathi news)

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून जलजीवन मिशनची सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत सहा महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत १,२२२ योजना मंजूर असून १,२२१ कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

ग्रामीण पुरवठा विभागाकडील आकडेवारीनुसार आतापर्यंत २३४ योजनांची कामे पूर्ण झाली असून १ हजार २२ कामे प्रगतिपथावर आहेत. यातील ८२८ योजना ३१ मार्च २०२४ अखेर पूर्ण होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. काही तांत्रिक चुकांमुळे पाणी पुरवठा योजनांना मुदतवाढ देण्याचे प्रस्ताव प्रलंबित राहत होते.

सदर प्रस्ताव पडून होते. मात्र, आता मुदतवाढ देण्याचे अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक यांना प्रदान करण्यात आले आहे. १७ जानेवारी पर्यंत ४५ योजनांचे मुदतवाढीचा प्रस्तावांना मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत ८० प्रस्तावांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे एकूण १२५ योजनांना विभागाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ३२ योजनांचे फेर आराखडे तयार करून मंत्रालयात मंजुरीसाठी दाखल केलेले आहेत, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच यातील १६ योजनांचे काम सुरू होऊन बंद पडले आहे. यात चांदवड तालुक्यातील सर्वाधिक ५ योजनांचा समावेश आहे.

विहिरीवरील योजना तेथील ग्रामस्थांनी नाकारत, श्वास्वत पाणी स्रोतांतून योजना कराव्यात अशी मागणी केली आहे. त्र्यंबकेश्वर मधील ४ व निफाड तालुक्यातील ३ विहिरी कोरड्या गेल्या आहेत. याशिवाय कळवण तालुक्यातील ३ व नांदगाव तालुक्यातील १ या योजनांचे काम सद्यःस्थितीत बंद आहे. बंद झालेली कामे सुरू सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT